आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीमध्ये असलेल्या एनआरआय महिलेने पाहिले पंजाबमधल्या घरात घुसले आहेत चोर, ही शक्कल लढवून पाठवले तुरूंगात, तुम्हीही करू शकता असे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुराली(पंजाब)- घरात चोर घुसले होते, पण CCTV टेक्नोलॉजीच्या मदतीने इटलीत असलेल्या एनआरआय महिलेने त्यांना पाहिले आणि पोलिसांक पकडवले. शनिवारी रात्री 2 वाजता चोर कमलजीक कौर यांच्या घरात घुसले, रिकाम्या घरातून आवाज आला म्हणून शेजाऱ्यांना इटलीला फोन करून त्यांना माहिती कळवली. त्यानंतर कमलजीत यांनी मोबाइलला कनेक्टेड घरात लागलेल्या सीसीटीवी कॅमरात सगळं की, घरात तीन चोर घुसले आहेत. त्यांच्याकडे लोखंडाचा रॉड, स्क्रुड्रायव्हर आणि करवत होती. 


नंतर दोघांना पोलिसांना घटनास्थळावरून पकडले
सीसीटीव्हीत पाहिल्यानंत कमलजीत यांनी लगेच नातेवाईक आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तीनपैकी दोघांना पकडले, तर एक चोर गाडीवरून पऴून गेला. वार्ड नंबर-7 स्थित सत्यसाईं मंदिराजवळ एनआरआय कमलजीत कौरयांचे घर आहे. त्या जेव्हाही भारतात येतात तेव्हा कुरालीतील यांच घरात राहतात.


शेजाऱ्यांनी घराला घेरले
कमलजीत कौरने कुरालीच्या घरात घुसलेले चोर पाहून भाऊ गोपाल सिंग यांना फोन केला. गोपाल सिंगने शेजारी बलविंदर सिंग, रघुवीर सिंग, प्रिंस, मोहन सिंग यांना बोलवले आणि घराला घेरून घेतले. पोलिसांच्या येण्याच्या आधीच लोकांनी एका चोराला पकडले तर दुसरा घरातच लपला होता, त्याला पोलिसांनी पकडले.


15 कॅमेरे मोबाईला लिंक होते
गोपाल सिंग यांनी सांगितले की, ही त्यांचा भाऊ गुरजिंदर सिंग उर्फ नीटाचे घर आहे. मागच्या महिन्यात त्यांची वहिणी कमलजीत कौर इटलीला परत गेल्या. पण सुरक्षेसाठी त्यांन घराला 15 हाय रेजोल्यूशन कॅमेरे लावले, आणि त्यांना आपल्या मोबाईलला लिंक केले.


सिक्योरिटी गॅजेट्स इंस्टॉलेशन एक्सपर्ट ईश्वर बब्बरने सांगितले, सीसीटीव्ही कॅमरे मोबाइलवर अॅप लोड करून कनेक्ट करता येतात. त्यातून तुम्ही कोठेही बसून सगळं लाईव्ह पाहू शकता. त्याशिवाय आज असे गॅजेट्स आहेत जे अलार्म वाजवतात आणि तुम्हाला किंवा पोलिसांना याची माहिती देतात.

 

बातम्या आणखी आहेत...