आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसा रद्द होण्याच्या भीतीने एनआरआय पती पत्नीसोबत करताहेत तडजोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहबूब अली

हिसार - मला माफ करा, वेळेच्या अभावी तुमच्याजवळ येत नव्हतो. आता सोबत फिरण्याबरोबर सोबतही ठेवू. तुमच्या सांगण्यानुसारच विदेशात नोकरी करू. ही गोष्ट हरियाणातील १० एनआरआय नवरदेवांनी त्यांच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रातील आहे. राज्य महिला आयोगाने पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिल्यामुळे या पतींचे पत्नीप्रेम जागृत झाले आहे. यात तडजोडीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हिसार, करनाल, रोहतक, पंचकुला, अंबाला, गुरुग्राम, पानिपत, सोनिपतमधील २४ विवाहित महिलांनी राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले होते. विदेशात नोकरी करणाऱ्या पतींनी मारहाण केल्याशिवाय काहींनी दुसरे लग्न केल्याचा आरोप या महिलांनी केला होता. महिला आयोगाने ५ एनआरआय पती आणि पत्नीमध्ये तडजोड घडवून आणली. उर्वरित १० एनआरआय पती १० पेक्षा जास्त पत्रे पाठवल्यानंतरही आयोगासमोर हजर झाले नाहीत. यातील काही प्रकरणे राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रतिभा सुमन सांगतात की, पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर एनआरआय पतींनी पत्र लिहून पत्नीला सोबत ठेवण्याची ग्वाही दिली आहे.असा देतात धोका

केस 1 : करनाल येथील विवाहितेने तक्रार केली होती की, जर्मनीत नोकरी करणारा तिचा पती लग्नानंतर १५ दिवसांनंतरच तेथे गेला होता. नंतर बोलणेही बंद केले. त्याने जर्मनीत आधीच लग्न केल्याचे समोर आले. यामुळे पतीसह ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. केस-2 : राेहतक येथील विवाहितेने सांगितले की, ऑस्ट्रेलियात नोकरी करणाऱ्या सिरसा येथील तरुणासोबत लग्न झाले. परत गेल्यानंतर त्याने बोलणे बंद केले. 
 

बातम्या आणखी आहेत...