Home | National | Other State | NSA Ajit Doval sharing his experience in lahore as under cover agent

अजीत डोभाल यांनी सांगितला पाकिस्तानात 7 वर्षे केलेल्या हेरगिरीचा रंजक किस्सा, लाहोरमध्ये 'त्या' एका चुकीमुळे पकडलो गेलो असतो..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 01:02 PM IST

डोभाल यांच्या कानाला छिद्र पाहिले आणि त्यांना कोणी ओळखू नये, म्हणून सर्जरी करण्यास सांगितले.

  • NSA Ajit Doval sharing his experience in lahore as under cover agent

    नॅशनल डेस्क- राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल हे पाकिस्तानात 7 वर्षे राहिले होते. पाकिस्तानात हेरगिरी करून ते महत्त्वाची माहिती भारताला देत होते. अजीत डोभाल यांनी पाकिस्तानात असतानाचा एक रंजक किस्सा सांगितला. एकदा डोभाल स्मशानभुमीत उभे होते, तेव्हा एका व्यक्तीने त्यांना ओळखले होते. तो व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तो व्यक्ती हिंदू होता. त्याने डोभाल यांच्या कानाला छिद्र पाहिले आणि त्यांना कोणी ओळखू नये, म्हणून सर्जरी करण्यास सांगितले.

    अजीत डोभाल यांच्या नेतृत्त्वात भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्याचबरोबर पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Trending