आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात 'न्यूड पार्टी' होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी सुरू केला तपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोवा म्हटले की, सगळ्यांना आठवतं समुद्र किनारा, परदेशी नागरीक, पार्टी, एन्जॉयमेंट. पण, कधी-कधी हीच पार्टी किंवा एन्जॉयमेंट अती झाली तर? असेच एक प्रकरण सध्या गोव्यात सोशल मीडियावर व्हायरल होतंय. गोव्यातील या व्हायरल पोस्टमध्ये राज्यात "न्यूड" पार्टीच आयोजन केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनारी ही "न्यूड" पार्टी होणार असल्याचे या पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस या व्हायरल पोस्टमागील सत्यता तपासत असून, असे अनुचित प्रकार राज्यात घडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या व्हायरल पोस्टरमध्ये दावा करण्यात येत आहे की, पार्टीमध्ये 15-20 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं त्याला, हवं तसं "सेक्स" करता येईल असेही पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी पोस्टर्सची गांभीर्याने दखल घेत शोध सुरू केला आहे. गोवा महिला काँग्रेस अध्यक्षांनी या पोस्टरवरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. प्रतिमा कोटिन्हो यांनी म्हटले की, "मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत."  

बातम्या आणखी आहेत...