आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Number 7 In 2012 When What Will Happen With These People

जाणून घ्या अंक ७ असणा-या लोकांसाठी कसे आहे हे वर्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंक 7: - जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा शुभ अंक 7 आहे. या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. 7 अंक असणार्‍या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. जाणून घ्या अंक ७ असणा-या लोकांसाठी कसे आहे हे वर्ष?
जानेवारी - या महिन्यात घर खरेदी करण्‍याचे अथवा बांधण्याचे योग आहेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीच्या कामांना विलंब होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाग्य साथ देईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. व्यापार व्यवसायात प्रगती साधाल. समाजात प्रतिष्‍ठा वाढेल. या महिन्यात चंद्राची आराधना करावी. सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करावे.
फेब्रुवारी- शुभ अंक 7 असणारे लोक स्वतंत्र विचार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. अगदी सहज ते कोणालाही प्रभावित करून घेत असतात. चंद्राप्रमाणे त्यांचे मनही चंचल असते. ज्यांच्या जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाले असेल त्याचा शुभ अंक 7 मानला जातो. यांचा स्वामी चंद्र आहे. या महिन्यात शुभवार्ता कळणार आहेत. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग व्हाल. कार्यक्षेत्रात वाढ होऊन आवकही वाढेल. आई-वडिलांचा सहवास लाभेल. तुमच्या कामाचे कौतूक होईल. धार्मिक कार्यास वेळ द्यावा लागेल. विवाहाचे प्रस्ताव येतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
मार्च - शुभ अंक 7 असणारे लोक चंद्र प्रधान असतात. चंद्राला मनाचे नियंत्रकही म्हटले जाते. चंद्राशी संबंधित अंक असणारे लोक अमावस्या आणि पोर्णिमेच्या दिवशी खूप प्रभावित दिसतात. शुभ अंक 7 असणारे लोक स्वतंत्र विचार करणारे असतात तसेच ते आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनीही असतात.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला असेल त्यांचा शुभ अंक 7 आहे, असे मानले जाते. या लोकांसाठी मार्च महिना फायदेशीर ठरणार आहे. आई-वडिलांकडून सहकार्य मिळणार आहे. मुलांच्या प्रगतीने आनंद मिळेल. तुमच्या कामावर अधिकारीवर्ग प्रसन्न होतील. विरोधकांवर मात कराल. नशिबाची चांगली साथ लाभेल. आवकही उत्तम राहील. मारुतीची पूजा करा. घराचे स्वप्न पूर्ण होईल. दररोज शिवशंकराचे दर्शन घेऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे.
एप्रिल - ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला आहे. त्याचा शुभ अंक 7 मानला जातो. अगदी सहज हे लोक समोरिल व्यक्तिला प्रभावित करून घेतात. हा अंक चंद्राशी संबंधित असल्याने हे लोक चंचल स्वभावाचे असतात. त्यामुळे ते नेहमी आनंदी असतात. कोणताही विषय असो ते गप्पामध्ये सहभागी होतात. सगळ्यांना आनंदी ठेवतात. एप्रिल महिन्यात त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. महिन्याच्या मध्यात आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागेल. महिन्याच्या अंतिम आठवड्यात परिस्थिती सुधारेल. आवक वाढेल. कुटुंबियांना वेळ द्याल. मात्र मुलांविषयी चिंता सतावेल. मारुतीची आराधना करावी. जोडादारासोबत वाद होणार नाही याची काळजी घ्या.
मे - या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. या महिन्यात कोर्ट कचेरीच्या कामांचा ताण निर्माण होणार आहे. वादविवाद टाळा. या महिन्यात श्री विष्णूचे पूजन करा. प्रगतीतील अडथळे दूर होतील. महिन्याच्या मध्यात काही काळ चिंता राहील. वाहन सांभाळून चालवा. त्यानंतर स्थिती सुधारेल. अनपेक्षित धन लाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विवाहाचे प्रस्ताव मिळतील. व्यापार-व्यवसायात फायद्याचे व्यवहार होतील. शनिची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील.
जून - 7 अंक असणारे लोक धार्मिक कार्यात अधिक रमतात. अंध विश्वासावर यांचा विश्वास नसतो. चंद्राची उपासना केल्याने अधिक लाभ होईल. महिना साधारण राहील. आवक चांगली राहील परंतु त्यातून फायदा काहीच होणार नाही. मेहनतीचे फळ खूप विलंबाने मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. आत्मविश्वास डगमगेल. वाहन चालवताना काळजी घ्या. महिन्याच्या मध्यात कार्यात गती येईल. प्रतिष्‍ठा वाढेल. नवीन जबाबदारी स्विकाराल. प्रवासाचे योग आहेत. मारुतीची आराधना करावी. सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करावे. पांढरी वस्तू दान करावी.
जुलै - या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. अंकज्योतिषनुसार चंद्राचा या लोकांवर प्रभाव असतो. चंद्रप्रमाणेच 7 अंक असणार्‍या लोकांचा स्वभाव चंचल असतो. हे लोक नेहमी आनंदी असतात. सगळ्यांना आनंदी ठेवतात. या महिन्यात आवक वाढणार आहे. संततीबाबत शुभवार्ता कळतील. घराचे स्वप्न पूर्ण होईल. परिश्रमाचे फळ मिळेल. महिन्याच्या मध्यात अडचणी वाढणार आहेत. आरोग्यविषयक समस्या राहतील. वरुणदेवाची पूजा करावी. पांढरी वस्तू दान करावी.
ऑगस्ट - हे लोक प्रभावशाली असतात. चंद्राशी संबंधित असल्याने 7 अंक असणारे लोक चंचल स्वभावाचे असतात. हे लोक नेहमी आनंदी असतात आणि सगळ्यांना आनंदी ठेवतात. महिन्याच्या मध्यात आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागेल. महिन्याच्या अंतिम आठवड्यात परिस्थिती सुधारेल. सोबत आवकही वाढणार आहे. कुटुंबाला वेळ देऊ शकाल. शनि आणि मारुतीची आराधना करावी. जोडादारासोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी.
सप्टेबर - सामान्यत: शुभ अंक 7 चे लोक लेखक, चित्रकार अथवा कवी असतात. त्यांचे प्रत्येक कार्य हे नाविन्यपूर्ण असते. कुठलीही गोष्ट सांगताना ते वेगळ्या पध्दतीने सांगतात. त्यामुळे ते काही क्षणातच समोरच्या व्यक्तींना प्रभावित करतात. सप्टेबर महिन्यात अशा लोकांना नशिबाची साथ लाभणार आहे. कार्यात प्रगती होईल. नोकरदारांना शुभ समाचार कळतील. वरिष्‍ठांचे सहकार्य मिळेल. शिवशंकर आणि शनि देवाची आराधना केल्यास शुभफळ मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवासाचे योग आहेत. नवीन घरात प्रवेश कराल. अनोळखी व्यक्तिंपासून सावध राहा.
ऑक्टोबर - जर तुमचा जन्म महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा शुभ अंक 7 आहे. या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. वरुणदेव जलतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे 7 अंक असणार्‍या व्यक्तिवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे परंतु त्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे. वादविवादापासून दूर राहा. कोर्ट कचेरीचे निर्णय विरोधकांच्या बाजूने लागण्‍याची शक्यता आहे. त्यामुळे तणाव निर्माण होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्थिती सुधारेल. व्यापार व्यवसायात प्रगती साधाल. समाजात प्रतिष्‍ठा वाढेल.
नोव्हेंबर - या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. 7 अंक असणार्‍या व्यक्तिवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. या महिन्या आश्वर्चकारक घटना घडतील. कुटूंबाला वे देऊ शकाल. अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. नोकरदारांसाठी बदलीचे योग आहेत. सहकार्‍यांमध्ये वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आवक साधारण राहील. आरोग्याच्या किरकोळ अडचणी असतील. विरोधक कारस्थान रचतील. परंतु आत्मविश्वासाने तुम्ही सामोरे जाल. व्यापार- व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेला जाल. आवक पेक्षा जास्त खर्च होईल. मारोतीला मंगळवारी शेंदूर अर्पण करावा.
डिसेंबर - ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला आहे. त्यांचे प्रत्येक कार्य हे नाविन्यपूर्ण असते. कुठलीही गोष्ट सांगताना ते वेगळ्या पध्दतीने सांगतात. त्यामुळे ते काही क्षणातच समोरिल व्यक्तींना प्रभावित करतात. त्यामुळे ऑफिस असो अथवा कार्यालय या व्यक्तिंना मान सन्मान मिळतो. जुन्या गोष्टींवर या लोकांचा विश्वास बसत नाही. मात्र त्यांना तंत्र-मंत्राची आवड असते. या महिन्यात भाग्यकारक गोष्‍टी घडतील. वेळेचे महत्त्व समजून कार्य करा. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी स्विकाराल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आवक वाढेल. संततीबाबत चिंता राहील. त्वचेविषयक आजार उद्‍भवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. मारुतीचे पूजन करून शनिदेवाला तेल अर्पण करावे.