आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांत कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत 58% वाढ - सीबीडीटीचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या संख्येत ४ वर्षांमध्ये ६८% वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या ४८ हजार ४१६ होती. २०१७-१८ मध्ये ही संख्या वाढून ८१ हजार ३४४ वर पोहोचली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) सोमवारी अहवाल जारी केला असून यात आकडेवारी जाहीर करण्यात आली. 


देशात वैयक्तिक आणि काॅर्पोरेट करदात्यांची एकत्रित संख्या पाहिली तर यात वाढ झाल्याचे दिसते. आता देशात १.४० लाख कोट्यधीश करदाते आहेत. याआधी २०१४-१५ मध्ये ८८ हजार ६४९ लोकांनी त्यांचे उत्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे घोषित केले होते. 
चार वर्षांच्या कालावधीत प्राप्तिकर परतावा दाखल करणाऱ्यांच्या संख्येत ८०% वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये ३.७९ कोटी लोक परतावा दाखल करत होते. २०१७-१८ मध्ये ही संख्या ६.८५ कोटींवर गेली. 


सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले की, २०१७-१८ मध्ये प्रत्यक्ष कर-जीडीपीचे गुणोत्तर ५.९८% होते. मागील १० वर्षातील ही उत्तम आकडेवारी आहे. २०१४-१५ मध्ये ८८ हजार ६४९ लोकांनी उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट केले होते. २०१७-१८ मध्ये ही संख्या १ लाख ४० हजार १३९ वर पोहोचली आहे. कर वसुलीच्या दृष्टीने प्राप्तिकर विभागाने मागील चार वर्षांमध्ये प्राप्तिकर विभागाने कर कायद्यांमध्ये अनेक बदल केल्याने सुधारणा झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...