आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीशांची संख्या-संपत्तीत सर्वाधिक वाढ भारतात, संख्येत 20, तर संपत्तीत 22 % वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  कोट्यधीशांच्या संख्येत आणि त्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमध्ये आशिया-प्रशांत देशांमध्ये भारत सर्वात पुढे आहे. २०१६ ते २०१७ दरम्यान भारतातील कोट्यधीशांची संख्या २० टक्के, तर त्यांची संपत्ती २२ टक्क्यांनी वाढली आहे. कन्सल्टन्सी संस्था कॅपजेमिनीच्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या आशिया पॅसिफिक वेल्थ अहवालात ही माहिती देण्यात आली. या यादीनुसार ज्यांच्याकडे कमीत कमी एक मिलियन डॉलर म्हणजेच सात कोटी रुपये आहेत, त्यांना कोट्यधीश म्हटले जाते.  


आशिया प्रशांत क्षेत्रात जपानमधील श्रीमंतांकडे सर्वाधिक ५४१ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनच्या कोट्यधीशांकडील एकूण संपत्ती ४५४ लाख कोटी रुपये आहे. आशियातील सर्व श्रीमंतांची संपत्ती २०१७ मध्ये १,५१२ लाख कोटी रुपये होती. ही २०१० च्या तुलनेमध्ये दुपटीने वाढली आहे. २०२५ पर्यंत ही संपत्ती पुन्हा दुपटीने वाढून ३,००० लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून त्यात ४१.४ टक्के वाढ आशिया पॅसिफिकची होती.  

 

१४४% वाढ चीनमध्ये  
कॅपजेमिनीने २०१० पासून २०१७ पर्यंत संपत्तीचा आढावा घेतला आहे. या दरम्यान चीनमधील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक १४४ टक्के वाढ झाली आहे. जपानच्या कोट्यधीशांची संपत्ती ८७ टक्के आणि भारतीयांची ८३ टक्के वाढली आहे.  

 

आशिया-प्रशांत मध्ये संख्या १२.१% वाढली  
देश                वाढ  

भारत         २० टक्के  
द.कोरिया    १७.३ टक्के  
हाँगकाँग      १५ टक्के  
थायलंड      १३ .६ टक्के  
चीन           ११.२ टक्के  
जपान         ९.४ टक्के  

 

 

आशिया-प्रशांतच्या संपत्ती १४.८% वाढली 
भारत           २१.६%  
द. कोरिया    १८.३% 
हाँगकाँग       १६.३% 
थायलंड        १४.९% 
चीन             १२.५% 
जपान          १०.३% 

 

७ वर्षांत भारतीय कोट्यधीशांची संपत्ती ८३ टक्के वाढली  
२०१०    ४१ लाख कोटी रुपये  
२०११    ३३ लाख कोटी रुपये  
२०१३    ४३ लाख कोटी रुपये  

२०१४    ५५ लाख कोटी रुपये  
२०१६    ६१ लाख कोटी रुपये  
२०१७    ७५ लाख कोटी रुपये

 

कोट्यधीशांची एकूण संपत्ती १,५१२ लाख कोटी रुपये 
जपान           ५४१ लाख कोटी रुपये 
चीन              ४५४ लाख कोटी रुपये 
भारत             ७५ लाख कोटी रुपये 
हाँगकाँग         ६३ लाख कोटी रुपये 
ऑस्ट्रेलिया     ६१ लाख कोटी रुपये 
द. कोरिया      ४७ लाख कोटी रुपये

 

जपानमध्ये सर्वाधिक ३१ लाख कोट्यधीश  
जपान            ३१.६२ लाख  
चीन              १२.५६ लाख  
ऑस्ट्रेलिया    २.७८ लाख  
भारत            २.६३ लाख  
द. कोरिया     २.४३ लाख  
हाँगकाँग        १.७० लाख

बातम्या आणखी आहेत...