आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Number One Ankita Champion', Second Prize In The Session; England's Nekatha Bens Lost In The Final

'नंबर वन अंकिता चॅम्पियन', सत्रात दुसरा किताब; फायनलमध्ये इंग्लंडच्या नेकथा बेन्सचा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर कोर्टला नमन करताना अंकिता रैना - Divya Marathi
विजयानंतर कोर्टला नमन करताना अंकिता रैना

साेलापूर : भारताची नंबर वन टेनिसपटू अंकिता रैना रविवारी आयटीएफ चॅलेंजर टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिला एकेरीचा किताब पटकावला. यासह तिच्या नावे यंदाच्या सत्रात दुसऱ्या विजेतेपदाची नाेंद झाली. तिने आता महिला एकेरीच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या नेकथा बेन्सवर मात केेली. तिने एक तास २५ मिनिटांत ६-३, ६-३ अशा फरकाने विजयश्री खेचून आणली. या एकतर्फी विजयासह तिने या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच तिच्या करिअरमधील हा नववा किताब ठरला. तिने शनिवारी नार्वेच्या उलरिके इकेरीच्या साेबत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यासह तिने या स्पर्धेत किताबाचा डबल धमाका उडवला. तिची या दाेन्ही गटातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे तिला विजेतेपदाला गवसणी घालता आली.

मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने फायनलमध्ये सरस खेळी केली. तिने बॅक हॅन्ड ड्राइव्ह व भेदक सर्व्हिसच्या बळावर सरळ दाेन सेटमध्ये विजय साकारला. जामश्री रियालटीचे संचालक राजेश दमानी, प्रिसीजन कॅमशाफ्ट्स लि. च्या वतीने चषक देऊन गौरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...