आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० : नंबर वन पाकिस्तान संघाचा सलग सहाव्यांदा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्थ - तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १० गड्यांनी पराभूत केले. पाकिस्तानने दिलेल्या अवघ्या १०७ धावांचे लक्ष्य यजमान संघाने एकही गडी न गमावता गाठले.
ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने आपल्या नावे केले. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. टी-२० क्रमवारीत नंबर वन असलेल्या पाकिस्तानचा हा सलग सहावा टी-२० पराभव आहे. यापूर्वी श्रीलंकेने ३-० ने आणि इंग्लंडने १-० ने पाकिस्तानला हरवले. एवढ्या पराभवानंतरही पाकिस्तान २०२० मध्ये सुरुवात नंबर वन टी-२० टीम म्हणूनच करेल. कारण नंबर दोन टीम ऑस्ट्रेलिया आता एकही टी-२० सामना खेळणार नाही.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच संपूर्ण संघ २० षटकांत ८ बाद १०६ धावा करू शकला. केवळ दोनच फलंदाज दहाचा आकडा गाठू शकले. इफ्तिखार अहमदने ४५ आणि इमाम उल हकने १४ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने ३ विकेट घेतल्या. सीन एबॉट व मिचेल स्टार्कने २-२ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ११.५ षटकांत लक्ष्य गाठले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नाबाद ४८ आणि अॅरोन फिंचने ५२ धावा काढल्या. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १० गड्यांनी पराभूत केले. पाकिस्तानने दिलेल्या अवघ्या १०७ धावांचे लक्ष्य यजमान संघाने एकही गडी न गमावता गाठले. ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने आपल्या नावे केले. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. टी-२० क्रमवारीत नंबर वन असलेल्या पाकिस्तानचा हा सलग सहावा टी-२० पराभव आहे. यापूर्वी श्रीलंकेने ३-० ने आणि इंग्लंडने १-० ने पाकिस्तानला हरवले. एवढ्या पराभवानंतरही पाकिस्तान २०२० मध्ये सुरुवात नंबर वन टी-२० टीम म्हणूनच करेल. कारण नंबर दोन टीम ऑस्ट्रेलिया आता एकही टी-२० सामना खेळणार नाही.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच संपूर्ण संघ २० षटकांत ८ बाद १०६ धावा करू शकला. केवळ दोनच फलंदाज दहाचा आकडा गाठू शकले. इफ्तिखार अहमदने ४५ आणि इमाम उल हकने १४ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने ३ विकेट घेतल्या. सीन एबॉट व मिचेल स्टार्कने २-२ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ११.५ षटकांत लक्ष्य गाठले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नाबाद ४८ आणि अॅरोन फिंचने ५२ धावा काढल्या. 
 

सरासरी ५१ चेंडूंवर बाद होतोय वॉर्नर 
> सलामीवीर डेव्हिड वॉर्नर २०१९ मध्ये टी-२० मध्ये सरासरी ५१ चेंडूनंतर बाद होत आहे.
> कोणत्या एका वर्षात बाद होण्याची सर्वाधिक सरासरी विराट कोहलीची (२०१६ मध्ये ६१ चेंडूंत) आहे.
> पाकिस्तानचे अव्वल ४ फलंदाजात एकाचाही स्ट्राइक रेट १२५ पेक्षा अधिक नाही. इमामचा १२०, बाबरचा १२५, रिजवानचा ११५ आणि हॅरिसचा १०६ आहे. 
> पाकिस्तानने २०१७ आणि २०१८ मध्ये ८६ टक्के टी-२० सामने जिंकले. यंदा केवळ १० सामने जिंकले.