आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यवाणी / न्युमरोलॉजिस्ट संजय जुमानी म्हणाले, निक जोनसला प्रियांका चोप्राच्या डोमिनेटिंग स्वभावापासून सावध राहावे लागेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने जाधपूर येथील उम्मेद पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. या दोघांच्या नात्याविषयी सेलिब्रिटी न्युमरोलॉजिस्ट संजय बी जुमानी यांनी भविष्यवाणी केली आहे. संजय जुमानी हे शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर  यांच्यासोबत काम करतात. त्यांनी विवाहबंधनात अडकणा-या प्रियांका-निकविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

 

13 वर्षांपूर्वीचे प्रेडिक्शन ठरले खरे...  
संजय यांनी सांगितले, प्रियांका चोप्राची जन्मतारखेत 9 नंबर हा दोनदा येतो (18+7+1982=9) आणि (1+8=9). ती वयाच्या 36  (9) व्या वर्षी लग्न करत आहे. हे मी 13 वर्षांपूर्वीच सांगितले होते. एका मुलाखतीत त्यांनी प्रियांकाच्या लग्नाविषयी हे भाकित वर्तवले होते. 9 नंबर हा मंगळाचा असतो आणि प्रियांकाच्या बाबतीत हा नंबर दोनदा येतो.  प्रियांका स्वभावाने अतिशय महत्त्वकांक्षी आहे.

 

निक राहावे लागेल सावध
- प्रियांका 18 (9) वर्षांची असताना मिस वर्ल्ड बनली होती. तर 27  (9) व्या वर्षी 'फॅशन' आणि 'दोस्ताना' या चित्रपटांच्या माध्यमातून ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली. तिचे नाव 9 नंबर असलेल्या अक्षय कुमारसोबत जोडले गेले होते. असे अक्षयची कन्या रास असल्याने झाले होते.

 

- निक ( जन्मतारीख 16 सप्टेंबर) सुद्धा कन्या राशीचा आहे. माझ्या सल्ला आहे की, निकने प्रियांकाच्या डोमिनेटिंग, स्ट्रेट फॉर्वर्ड  स्वभावापासून सावध राहायला हवे. 


दोघांचेही होतील मूड स्विंग..
- प्रियांका आणि निक हे दोघेही पाणी आणि भूमीचे प्रतिक आहेत. त्यामुळे ते भूमी आणि पाणीप्रमाणे मेड फॉर इच अदर आहेत, जे कायम सोबत असतील. त्यांच्यात अनेक गोष्टींत साम्य आहे. निक आणि पीसीच्या नावाच्या स्पेलिंगची टोटल 2 आहे. Nick (5+1+3+2=1+1=2) PC (8+3=1+1=2). दोघेही 2 नंबर (चंद्र) आणि 7 नंबर (जल) द्वारे नियंत्रित आहेत.


- हा ग्रह मेंटल स्पेस आणि मूड स्विंगचे कारण बनू शकतो. त्यासाठी निकला योगा प्राणायाम आणि ध्यान करायला हवे. तर प्रियांकाला योगा आणि व्यायाम. या अॅक्टिव्हिटिज दोघांनाही शांत राहण्यास मदत करतील.

 

करिअरविषयीचा अंदाज... 
- 9 नंबरचे लोक मंगळ ग्रहाद्वारे नियंत्रित होत असतात. हा एक प्रज्ज्वलित ग्रह असून त्याला तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. हा ग्रह लोकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. 'Men are from Mars' असे म्हटले जाते. त्यामुळे प्रियांका कायम आघाडीवर राहील.  

 

- 9 नंबर हा फाइटर्सचा नंबर आहे. हे लोक चांगले लीडर आणि अधिकारी बनू शकतात. प्रियाका भविष्यात राजकारणात आली तर आश्चर्य वाटायला नको. मी यापूर्वीही सांगितले आहे की, वयाच्या 45 व्या वर्षी ती राजकारणात येऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...