Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | numerology and wallet tips for money

खिशात नेहमी हवा असेल पैसा तर लकी अंकाच्या रंगानुसार वापरावे पाकीट

रिलिजन डेस्क | Update - Dec 01, 2018, 12:37 PM IST

प्रत्येक स्त्री आणि पूरूषांने स्वतःच्या जन्मतारखेनुसार लकी रंगाचे पाकीट किंवा पर्स खिशात ठेवल्यास पाकीट नेहमी पैशांनी भर

 • numerology and wallet tips for money

  न्यूमरोलॉजी म्हणजे अंक ज्योतिषाचाही सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव असतो. उज्जैनचे अंक शास्त्री पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जन्मतारखेवरून प्रत्येक व्यक्तीचा एक लकी नंबर असतो. त्या लकी नंबरनुसार काही छोटे-छोटे उपाय केले तर लवकर फायदा होण्याची शक्यता वाढते.


  अशाप्रकारे जाणून घ्या, तुमचा लकी नंबर...
  स्वतःचा लकी नंबर जाणून घेण्यासाठी जन्म तारीख सिंगल डिजिटमध्ये काढावी लागेल. उदा. तुमची जन्म तारीख 12 असेल तर तुमचा मुळांक 1+2 = 3. तुमची जन्म तारीख 29 असेल तर तुमचा लकी नंबर असेल 2+9 = 11. उत्तर दोन अंकामध्ये आल्यास या दोन अंकांची पुन्हा बेरीज करावी 1 + 1 = 2 म्हणजेच तुमचा लकी नंबर 2 आहे.


  खिशात ठेवा लकी रंगाचे पाकीट
  अंक ज्योतिषनुसार प्रत्येक नंबरचा एक लकी रंगही असतो. त्या लकी रंगाचे पाकीट खिशात ठेवल्यास फायदा होऊ शकतो. अंक शास्त्री पं. भट्ट यांच्यानुसार स्त्री आणि पूरूषांनी स्वतःच्या जन्मतारखेनुसार लकी रंगाचे पाकीट किंवा पर्स खिशात ठेवल्यास त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही. याउलट त्यांचे पाकीट पैशांनी भरलेले राहते.


  लकी नंबर 1
  तुमच्यासाठी लाल रंगाचे पाकीट चांगले राहील. यासोबतच गुडलकसाठी लाल पाकीट किंवा हँडबॅगमध्ये तांब्याचे एक नाणे ठेवू शकता.


  लकी नंबर 2
  तुमच्यासाठी पांढऱ्या रंगाचे पाकीट लकी मानले जाते. यासोबतच शुभफळासाठी पांढऱ्या पाकीट किंवा हँडबॅगमध्ये चांदीचे एक नाणे ठेवू शकता.


  लकी नंबर 3
  मुळांक 3 असलेल्या लोकांसाठी पिवळ्या किंवा मेंदी रंगाचे पाकीट चांगले राहते. धनलाभासाठी पाकिटात एक गोल्डन रंगाचा फॉईलचा त्रिकोणी तुकडा ठेवू शकता.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या रंगाचे पाकीट तुमच्यासाठी लकी राहील...

 • numerology and wallet tips for money

  लकी नंबर 4 
  तुमचा मुळांक 4 असल्यास तुम्ही तपकिरी रंगाचे पाकीट ठेवू शकता. यासोबतच पाकिटात घरातील माती ठेवू शकता. लाभ होईल.


  लकी नंबर 5 
  तुमच्यासाठी हिरव्या रंगाचे पाकीट सर्वात चांगले राहील. यासोबतच पाकिटामध्ये मनीप्लँटचे पान ठेवणे उत्तम राहील.


  लकी नंबर 6 
  तुमच्यासाठी चमकदार पांढऱ्या रंगाचे पाकीट शुभ राहील. पाकिटात पितळाचे एक नाणे ठेवू शकता.

 • numerology and wallet tips for money

  लकी नंबर 7 
  तुमच्यासाठी बहुरंगी म्हणजेच मल्टिकलरचे पाकीट ठेवणे शुभ राहील. यासोबतच पाकिटात माशाचे चित्र ठेवणे लाभदायक राहील.


  लकी नंबर 8 
  मुळांक 8 असलेल्या लोकांसाठी निळ्या रंगाचे पाकीट खास राहील. यासोबतच विविध लाभ प्राप्तीसाठी पाकिटात एक मोरपंख ठेवावा.


  लकी नंबर 9 
  तुमच्यासाठी निळ्या किंवा नारंगी रंगाचे पाकीट ठेवणे सर्वात उत्तम राहील. यासोबतच पाकिटात पितळाचे एक नाणे ठेवणे शुभ राहील.

Trending