आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्योतिष शास्त्राप्रमाणेच भाग्य जाणून घेण्याच्या एका विधीला न्यूमरोलॉजी म्हणजे अंक शास्त्र म्हणतात. अंक शास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अंक एकच्या काही खास गोष्टी. सर्वात पहिले समजून घ्या, नंबर एक म्हणजे असे लोक ज्यांचा जन्म 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला असेल. अर्थात यांच्या जन्मतारखेचा योग एक असतो. अंक शास्त्रानुसार हे लोक वास्तवामध्येही नंबर वनच म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वांच्या पुढे राहतात. व्यवसाय, कला, टेक्निकल एवढेच नाही तर गुन्हेगारीमध्येही हे शीर्ष स्थानावर राहतात. नेतृत्त्व करणे यांचा स्वाभाविक गुण असतो.
सूर्य आहे स्वामी
ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10, 19, 28 असेल त्यांचा मुळांक 1 आणि स्वामी सूर्य असतो. हे लोक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. या लोकांमध्ये स्वाभाविकपणे इगो किंवा थोडासा अहंकार भाव असतो. हे आत्मनिर्भर, वचनाचे पक्के, दृढ इच्छाशक्तीने भरलेले आणि स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष स्थानावर असतात.
शुभ लक्षण
1,10,19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी प्रत्येक महिन्यातील याच तारखा शुभ राहतात. या लोकांचा दोन, चार आणि सात मुळांक असलेल्या लोकांसोबत ताळमेळ चांगला राहतो. म्हणजेच ज्या लोकांची जन्मतारीख 2, 4, 7, 11, 22, 25, 29 आणि 31 असेल त्यांच्यासोबत नंबर एक अंक असलेल्या लोकांचे खास कनेक्शन राहते. यांच्यासाठी शुभ दिवस रविवार आणि सोमवार आहेत. शुभ रंग पिवळा, हिरवा आणि तपकिरी आहे. एक मुळांक असलेली व्यक्ती नेहमी टॉप पोस्टवर दिसते. सहा आणि आठ मुळांक असलेल्या लोकांशी यांचे फारसे पटत नाही. यांच्यासाठी शुभ दिशा ईशान्य आहे.
मुकेश अंबानी आणि लादेन दोघांचाही मुळांक एक
जाणून घ्या, काही प्रसिद्ध एक मुळांक असलेल्या लोकांविषयी. पहिले नाव आहे सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये एक नंबरवर असलेले मुकेश अंबानी. यांचा जन्म 19 मार्चला झाला आहे. या व्यतिरिक्त धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा दोघांचीही जन्मतिथी 28 डिसेंबर, माजी आणि भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, विश्वसुंदरी सुश्मिता सेन, बॉलिवूडची पहिली सेक्स सिम्बल ऐक्ट्रेस झीनत अमान आणि भारताचे फेमस रेसलर दारासिंह यांचा जन्म 19 नोव्हेंबरला झाला होता. सुरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची जन्मतारीख 28 सप्टेंबर असून चिरयूवा सुंदर अभिनेत्री रेखा यांची जन्मतारीख 10 ऑक्टोबर आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची जन्म तारीख 10 जुलै तर बिल गेट्सयांची बर्थडेट 28 ऑक्टोबर आहे. याच यादीमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचाही समावेश आहे. लादेनचा जन्म 10 मार्चला झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.