आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Numerology : अभ्यासात हुशार असतात मुळांक 2 असलेले व्यक्ती परंतु प्रेमात राहतात मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला एक मुळांक असलेल्या लोकांच्या खास गोष्टींविषयी माहिती दिली होती. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मुळांक दोन असलेल्या लोकांच्या खास गोष्टी. ज्या लोकांची जन्म तारीख कोणत्याही महिन्यातील 2, 11, 20 आणि 29 असेल त्यांचा मुळांक दोन असतो.


चंद्र आहे स्वामी
कोणत्याही महिन्यातील 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुळांक डॉ असतो आणि स्वामी चंद्र ग्रह राहतो. हे लोक शांतता प्रिय असतात. कोमल स्वभावाचे असतात आणि यामुळे यांना प्राणी आणि पर्यावरणाविषयी विशेष प्रेम असते. अनेकवेळा लोक यांच्या याच सहृदयता स्वभावाचा गैरफायदा घेतात. अंक दोनच संबंध मनाशी असून चंद्र या अंकाला  संचालित करतो. यामुळे हे लोक मानसिक आकर्षण, हृदय भावना, सहानुभूती, संशय, घृणा आणि द्विधा मनस्थितीसारख्या दशेने ग्रस्त राहतात.


स्‍वभावग्रस्‍त गुण दोष
या लोकांच्या स्वभावावरून तुम्हाला लगेच समजू शकते की हे दोन मुळांक असलेले आहेत. हे लोक स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी फायदेशीर ठरतात. अगदी आपला स्वामी चंद्राप्रमाणे जो अंधारात राहून इतरांना अंधकारातून मार्ग दाखवतो. चंद्र ज्याप्रमाणे कमी-जास्त होत राहतो त्याचप्रमाणे यांचा स्वभावही मूड स्विंग असतो. हे लोक अत्यंत मनमिळाऊ, अंतर्ज्ञानी, प्रेमळ आणि सहायक असतात. एवढे असूनही कधीकधी उदास, अतिसंवेदनशील, असुरक्षित दिसून येतात.


शिक्षणामध्ये उत्तम
मुळांक 2 असलेले लोक उत्तम शिक्षण प्राप्त करतात. उत्कृष्ट कल्पनाशक्तीमुळे हे लोक चांगले प्रदर्शन करू शकतात. यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास हे लोक पैसे कमावून तो सेव्हिंग कसा करत येईल याचा जास्त विचार करतात. यामुळे यांची आर्थिक स्थिती चांगली राहते. यांनी कुठेही नोकरी केली तरी यशस्वी होऊ शकतात. भेलीही स्वतः उत्तम व्यावसायिक होऊ शकले नाही तरी धन कमावण्याच्या योजना बनवण्यात माहीर असतात. या लोकांनी जर 1, 4 आणि 7 मुळांक असलेल्या लोकांसोबत व्यवसाय केला तर जास्त यश प्राप्त होऊ शकते.


संबंधांमध्ये अस्थिरता
हे आपल्या स्वभावामुळे भावनात्मक रूपात अस्थिर असतात. या लोकांच्या संबंधांविषयी विचार केल्यास यांचे बहीण, भावासोबत चांगले संबंध राहतात परंतु कधीकधी मतभेदही झाले तर लगेच सुधारून घेतात. मित्रांसोबतच यांचे जास्त स्थिर संबंध राहत नाहीत. हे आपल्या मित्रांवर खूप प्रेम करतात परंतु अत्याधिक प्रेम आणि हस्तक्षेपामुळे मित्र यांना सोडून जातात. विवाह किंवा प्रेम संबंधाचा विचार केल्यास यामध्येही यांना जास्त यश प्राप्त होत नाही. अनेकवेळा यांना प्रेमात नुकसान झालेले दिसून येते तर काहीवेळा प्रेमासाठी आयुष्यभर वाट पाहत राहतात. एवढे असूनही विशेष म्हणजे यांचे कौटुंबिक जीवन सुखद राहते. यांच्या अपत्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त राहते आणि हे आपल्या मुलींवर खूप प्रेमही करतात.

बातम्या आणखी आहेत...