आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Numerology : 'झिरो ते हिरो' 3 मुळांक असलेले लोक कधीही घेत नाहीत माघार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला एक आणि दोन मुळांक असलेल्या लोकांच्या खास गोष्टींविषयी माहिती दिली होती. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मुळांक तीन असलेल्या लोकांच्या खास गोष्टी. ज्या लोकांची जन्म तारीख कोणत्याही महिन्यातील 3, 12, 21 किंवा 30 असेल त्यांचा मुळांक तीन असतो. या अंकाचा स्वामी बृहस्पती आहे. हे सर्व ग्रहांचे गुरु आहेत. बृहस्पती देवाच्या प्रभावामुळे या जातकांना जगात खूप प्रसिद्धी मिळते. 3 मुळांक असलेल्या लोकांच्या लिस्टमध्ये सर्वप्रथम नाव येते रजनीकांत यांचे. स्वबळावर रजनीकांत हे आज सुपरस्टार आहेत. यासोबतच बॉलिवूडमधील एक नाव म्हणजे गोविंदा यांचाही मुळांक 3 आहे. 


माघार घेणे पसंत नाही 
हे जातक अत्यंत स्वाभिमानी असतात. यांना विनाकारण कुणापुढेही झुकणे आवडत नाही. कोणाचेही उपकार ठेवत नाहीत. या लोकांना स्वतःच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. 


धाडसी असतात
3 मुळांक असलेले लोक खूप धाडसी असतात. यांना प्रामाणिक आणि चांगल्या मार्गावर चालणे आवडते. यामुळे कोणतेही काम करण्यास हे घाबरत नाहीत. हे लोक योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी स्वतःचे शक्ती प्रदर्शन करतात.


कष्टाळू असतात
बृहस्पती देवाच्या प्रभावामुळे हे जातक खूप मेहनती असतात. प्रत्येक काम मन लावून करतात. यांना घरी बसून इतरांवर अवलंबून राहून जीवन जगणे आजिबात आवडत नाही. यामुळे हे कोणावाराही अवलंबून न राहता स्वतः काम करतात.


रचनात्मक कलेमध्ये माहीर 
स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे हे लोक अत्यंत कलात्मक आणि रचनात्मक असतात. हे सर्वगुणसंपन्न असतात. 


उच्च शिक्षणाचे योग
गुरु बृहस्पती यांना ज्ञानाचे देवताही मानले जाते. यांच्या प्रभावाने तीन मुळांक असलेले जातक अभ्यासात खूप चांगले असतात. यांना विज्ञान आणि साहित्यामध्ये जास्त रुची असते. हे उच्च शिक्षण प्राप्त करतात.


आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू प्रगती 
या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार राहतो. सुरुवातीच्या काळात अभ्यासावर खूप खर्च होतो. काही काळाने वय वाढल्यानंतर जातक धन अर्जित करू लागतो. यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत असतात. परंतु संपत्तीसाठी कधीकधी कोर्टातही जावे लागते.


नात्यांकडून मिळत नाही सहकार्य 
मुळांक तीन असलेले लोक भाऊ-बहीण आणि नातेवाईकांसाठी पूर्णपणे समर्पित असतात परंतु या बदल्यात त्यांना तेवढे प्रेम मिळत नाही. मित्रांचा विचार केल्यास या जातकाची मैत्री 3,6 आणि 9 मुळांक असलेल्या लोकांसोबत चांगली राहते.


एकापेक्षा जास्त लग्नाचे योग 
3 मुळांक असलेल्या लोकांचे प्रेम संबंध अस्थायी असतात. हे जास्त काळ टिकत नाहीत. परंतु यांचे अरेंज मॅरेज चांगले राहते. या लोकांचे एकापेक्षा जास्त लग्न होण्याचे योग राहतात.

बातम्या आणखी आहेत...