आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Numerology : \'बाहुबली\' असतात नंबर चार मुळांक असलेले लोक, जाणून घ्या जीवनाचे रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कोणत्याही महिन्यात 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुळांक चार असतो. या मुळांकाचा स्वामी ग्रह राहू आहे. या मुळांकाचे लोक स्वबळावर जग बदलण्याची हिम्मत बाळगतात. याना स्वतःचे काम स्वतःच करायला आवडते.


स्वतःच्या विश्वात राहतात 
मुळांक चार असलेल्या लोकांविषयी हेच सर्वात योग्य तथ्य आहे. हे लोक स्वतःच सर्वकाही करण्यावर विश्वास ठेवतात. हे धाडसी, व्यवहार -कुशल आणि जिद्दी असतात. हे लोक कधीकधी अहंकारी, हट्टी आणि उपद्रवीही होऊ शकतात. या लोकांना घरातील, बाहेरची आणि राजकारणाची चांगली माहिती असते. हे मनमौजी असतात. यांच्या मनात एखादी गोष्ट बसली मग ती चुकीची जरी असली तरी सहजासहजी मनातून जात नाही. हे कोणावरही लगेच विश्वास टाकत नाहीत, यामुळे स्वतःचे काम स्वतःच करण्यावर जास्त विश्वास ठेवतात.


स्थिर बसू शकत नाहीत
मुळांक चार असलेले लोक एकाठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत. हे नेहमी काही न काही तरी करत राहतात. यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात जास्त रुची राहते. हे लोकांना चांगल्याप्रकारे प्रभावीत करू शकतात. हे आपल्या रहस्य गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु यामध्ये जास्त यशस्वी होत नाहीत. सहजपणे कोणाशीही मैत्री करत नाहीत परंतु एकदा मैत्री केली तर प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मैत्री जपतात. सामाजिक सन्मान मिळवण्याच्या नादात शत्रूही निर्माण करून घेतात.


वैवाहिक जीवनात अडचणी
मुळांक चार असलेल्या लोकांचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात फारसे ठीक राहत नाही. पती किंवा पत्नीच्या आरोग्य समस्या चालू राहतात. कुटुंबातील सदस्यांसोबतही यांचे जास्त जुळत नाही. यांचा एकटेपणा दूर होत नाही. क्रोधी स्वभावामुळे कधीकधी स्वतःचे नुकसान करून घेतात.


जीवनात चढ-उतार
मुळांक चार असलेल्या लोकांचे जीवन चढ-उताराने भरलेले राहते. यांची अचानक प्रगती होते आणि अचानकच जमिनीवरही येतात. जीवनात अकस्मात काही घटना घडू शकतात. ही स्थिती वयक्तिक आणि व्यावसायिक प्रत्येक प्रकारच्या जीवनात होते. हे लोक व्यवसाय आणि नोकरी दोन्हींमध्ये यशस्वी होऊ शकतात आणि अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. हे लोक खूप खर्च करतात आणि यामुळे जास्त सेव्हिंगही करू शकत नाहीत. हे सत्य आहे की तुमचा स्वभाव आणि विचार इतरांपेक्षा वेगळा आहे परंतु हे तुमच्यासाठी ठीक आहे सर्वांसाठी नाही.


शुभ चिन्‍ह
यांच्यासाठी शुभ दिशा नैऋत्य, क्षुब्ध धातू चांदी, शुभ रंग काळा, आकाशी, हिरवा, पिवळा आणि निळा आहे. यांच्यासाठी 2017 आणि 2020 शुभ वर्ष ठरू शकतात. शुभ महिना एप्रिल आणि ऑगस्ट. शुभ दिवस शनिवार आणि रविवार. शुभ तारखा 4, 13, 22 आणि 31.

 

बातम्या आणखी आहेत...