आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Numerology : कोणाकडूनही काम करून घेण्यात माहीर असतात या मुळांकाचे लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यातील 5,14 आणि 23 तारखेला झाले असेल त्या लोकांचा मुळांक 5 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह बुध आहे. हा ग्रह बुद्धी आणि ज्ञानाचा प्रतीक आहे. हा मुळांक असलेल्या जातकाची सर्वांशी मैत्री असते कारण बुध ग्रह सर्व ग्रहांचा मित्र आहे. हा अशुभ ग्रहांसोबत मिळून अशुभ आणि शुभ ग्रहांसोबत मिळून शुभ राहतो. हे आपल्या शत्रूलाही मित्र बनवून घेण्याची क्षमता ठेवतात आणि यामुळेच कोणाकडूनही आपले काम करून घेऊ शकतात.


शत्रू बनवत नाहीत
मुळांक 5 असलेल्या लोकांचा सर्वांशी संमिश्र संबंध राहतो. ते कोणाच्याही जास्त आहारी जात नाहीत आणि कोणालाही सहसा शत्रू बनवत नाहीत. या अंकाचा जातकांचा संबंध अंक 1, 4 आणि 8 यांच्यासोबत सामान्य आणि अनुकूल राहतो. परंतु अंक पाचसाठी अंक 2, 7 आणि 9 शुभ अंक नाहीत.


आव्हानांसाठी तयार असतात
हे लोक अत्यंत धाडसी असतात. कोणत्याही आव्हानांचा सहज सामना करतात. विषम परिस्थितीमधून मार्ग करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. स्वतःच्या हुशारीनेच सर्व अडचणींवर मात करतात.


चिंतेपासून मुक्त राहतात 
बुध ग्रहांमुळे हे जातक बुद्धी स्तरावर मजबूत राहतात. प्रत्येक गोष्ट योग्यप्रकारे समजून घेतात आणि यामुळेच एखाद्या गोष्टीचा विचार करून जास्त खुशही होत नाहीत आणि दुखीही होत नाहीत. यामुळेच चिंतेसारख्या गंभीर समस्येपासून दूर राहतात.


वैवाहिक जीवनात पाच मुळांक असलेले लोक भाग्यशाली राहतात. हे लोक आपल्या वागणुकीने जोडीदाराला नेहमी खुश ठेवतात. मुळांक पाच असलेले पुरुष वैवाहिक जीवनात संतुलन कायम ठेवण्यासाठी आपल्या पत्नीची इच्छा लक्षात घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.


या मुळांकाच्या स्त्रियांविषयी सांगायचे झाल्यास, या स्त्रिया सर्व गोष्टींमध्ये सतर्क असतात. विशेषतः आर्थिक गोष्टींमध्ये या जास्त सतर्क राहतात. जर यांच्या पटीने खर्चाच्या बाबतीत व्यवस्थित संतुलन ठेवले नाही तर या सर्व आर्थिक अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. कधीकधी परिस्थिती अशी होते की, पतीला स्वतःच्या वयक्तिक खर्चासाठीसुद्धा पत्नीवर अवलंबून राहावे लागते.

बातम्या आणखी आहेत...