Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Numerology prediction about number 6 in marathi

Numerology : मुळांक 6 असलेले लोक दीर्घकाळ जगतात आपले तारुण्य, हे आहे कारण

रिलिजन डेस्क | Update - Dec 07, 2018, 11:39 AM IST

मुळांक 6 असलेले लोक दिसायला अतिशय सुंदर असतात. हे सुगठीत शरीरयष्टीचे असतात. यांची उंचीही चांगली असते. आपल्या शरीयष्टी आण

 • Numerology prediction about number 6 in marathi

  ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यातील 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल त्यांचा मुळांक 6 असतो. या अंकाचा ग्रह स्वामी शुक्र आहे. यामुळे हे जातक प्रभावी, सुंदर आणि मन मोहून घेणारे असतात.


  इतरांना करतात आकर्षित
  मुळांक 6 असलेले लोक दिसायला अतिशय सुंदर असतात. हे सुगठीत शरीरयष्टीचे असतात. यांची उंचीही चांगली असते. आपल्या शरीयष्टी आणि सौंदर्यामुळे कोणालाही स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकतात.


  हौशी असतात
  शुक्र ग्रहाला सौंदर्याचा ग्रह मानले जाते. यामुळे या अंकाचे जातक सौंदर्य प्रेमी असतात. याना सजण्याची खूप आवड असते. हे खूप हौशीही असतात. नेहमी चांगले कपडे परिधान करून टीप-टॉप राहतात.


  वयाचा दिसत नाही प्रभाव
  शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे जातक दीर्घकाळ तरुण राहतात. स्वतःला फिट ठेवतात आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. हे लोक काळाप्रमाणे चालण्यावर विश्वास ठेवतात. यामुळेच अशा लोकांवर वयाचा प्रभाव दिसत नाही.


  स्वभावाने मनमिळावू
  हे जातक अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असतात. अनोळखी व्यक्तीलाही आपल्या संवादाने चांगला मित्र करून घेतात. हे बहुमुखी प्रतिभेचे धनी असतात. यांना एकटे राहणे आवडत नाही. हे कुटुंबाला एकत्र घेऊन चालणारे असतात. मनमिळावू स्वभावामुळे इतरांना आपला फॅन बनवतात.


  कोमल हृदय
  मुळांक 6 असलेल्या लोकांचे हृदय अत्यंत कोमल असते. इतरांच्या दुःखामध्ये हे स्वतःही दुःखी होतात. यांच्यामध्ये समर्पणाची भावना असते. यांचे हृदय विशाल राहते. इतरांची मदत करण्यास नेहमी तयार राहतात.


  कलेची आवड
  शुक्र ग्रहामुळे यांना कलात्मक गोष्टी करण्यात जास्त रस असतो. यांना नवीन-नवीन रचना करणे आवडते. हे लोक शिक्षणातही आघाडीवर राहतात.


  वैवाहिक जीवन कष्टदायक
  हे लोक पॉझिट जेंडरला स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात परंतु अनेकवेळा हे प्रेमाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. यांचे नाते अपूर्ण राहते. या व्यतिरिक्त लग्नानंतरही यांच्या जीवनात अडचणी येत राहतात.

Trending