Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Numerology prediction about number 7 in marathi

Numerology : जाणून घ्या, भाग्यांक जन्मांक सातच्या जीवनाचे रहस्य

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 12:53 PM IST

मुळांक 7 असलेले लोक श्रेष्ठ विचारक असतात तसेच यांची तर्कशक्ती मजबूत असते. हे लोक धार्मिक असतात परंतु प्रचुर रूढी परंपरां

 • Numerology prediction about number 7 in marathi

  ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यातील 7, 16, किंवा 25 तारखेला झाला असेल त्यांचा मुळांक 7 असतो. मुळांक सातचा स्वामी ग्रह केतू आहे. काही विद्वान मुळांक सातचा स्वामी ग्रह नेपच्यून मानतात. परंतु बहुतांश विद्वानांच्या मते केतू ग्रह मुळांक 7 चा अधिष्ठाता ग्रह आहे. हे जातक गूढ विद्या आणि साहित्यामध्ये विशेष रुची ठेवतात.


  मुळांक 7 असलेले लोक श्रेष्ठ विचारक असतात तसेच यांची तर्कशक्ती मजबूत असते. हे लोक धार्मिक असतात परंतु प्रचुर रूढी परंपरांपासून दूर राहतात. धर्म क्षेत्रामध्ये हे परिवर्तनशील विचारधारा ठेवतात. मुळांक सातचे जातक स्वतंत्र विचारांचे असतात. यांचे मन अशांत राहते. एकच विचार आणि ठिकाणावर जास्तवेळ टिकून राहू शकत नाहीत. तुमचे विचार सारखे बदलत राहतात. मनामध्ये काही न काही चालू असते. एवढेच नाही तर कधीकधी तुम्ही नकारात्मक विचारांच्या प्रभावाखालीही येऊ शकता.


  हे लोक कुटुंब आणि समाजात स्पष्टवक्ता स्वरूपात ओळखले जातात. स्वतःचे विचार रोखठोक मांडतात आणि कुणालाही घाबरत नाहीत. आत्मविश्वास भरपूर राहतो. समाजात प्रतिष्ठित असतात परंतु कधीकधी सामान्य गोष्टीलाही एवढे महत्त्व देतात की, नंतर ती गोष्ट सांभाळणे अवघड जाते.


  वैवाहिक जीवन सुखी राहते. मुळांक 7 असलेल्या लोकांचे प्रेम संबंध जास्त दिवस टिकत नाहीत. तुमचे स्वतंत्र विचार प्रेम संबंधाला प्रभावित करतात. या लोकांना प्रेमाचा दिखावा करणे आवडत नाही. हे लोक कुटुंब आणि सामाजिक संबंधांना जास्त महत्त्व देतात यामुळे यांचे कौटुंबिक संबंध चांगले राहतात.


  मुळांक 7 चे जातक स्वतःच्या मेहनतीनेच धन अर्जित करतात. जेवढी मेहनत करतात तेवढेच धन प्राप्त होते. जेवढे पैसे कमावतात त्यानुसारच खर्च करतात. दान-पुण्यावर हे जास्त खर्च करतात. मोक्ष प्राप्तीसाठी काहीही खर्च करण्यासाठी तयार राहतात.


  मुळांक सातचे सतर्क शारीरिक स्वरूपात कमजोर राहतात. याना पोटाचे आजार वारंवार होण्याची शक्यता राहते. मस्तिष्क संबंधित आजार उदा डिप्रेशनने पीडित राहू शकतात. या व्यतिरिक्त ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त होणे, त्वचा रोग, दृष्टी कमजोर अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते.


  शुभ रंग - या लोकांसाठी पांढरा रंग विशेष राहतो. फिकट पिवळाही शुभ राहतो. डार्क रंग अशुभ प्रभाव टाकतात.


  शुभ तारखा - 7 आणि 25 शुभ दिवस. १२३४ १० ११ आणि २० तारखा अनुकूल आहेत.


  शुभ दिवस - राईवर, सोमवार आणि गुरुवार


  मित्र आणि शत्रू अंक - मुळांक 2 आणि 7 अनुकूल तर 4 आणि 8 प्रतिकूल प्रभाव देतात.

Trending