आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृती सेननची बहीण नूपुर सेननने 'पानिपत' चित्रपट पाहिल्यानंतर साेशल मीडियावर एक भावुक पत्र लिहिले आहे. तिने पत्रात लिहिले, चित्रपटात आपल्या बहिणीला पार्वतीबाईच्या भूमिकेत पाहून काय वाटले..., नूपुरने लिहिले..., हे लिहिताना मी खूपच भावुक झाले आहे आणि मला अभिमान वाटत आहे. पार्वतीबाईचे पात्र कृतीने खूपच चांगल्या प्रकारे सादर केले. त्यांच्या पात्राला तिने न्याय दिला. चित्रपट पाहताना अनेकदा माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण हे आनंदाचे अश्रू होते. कृती तू स्टार आहेस, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना तुझे काम नक्कीच आवडले असेल, तुझ्या पात्राशी त्यांना प्रेम होईल. काय दमदार महिला आहे, असे सर्वांनी म्हटले असेल. ती आपल्या पतीसोबत ठामपणे उभे राहते. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. महिला होऊन ती लढते आणि स्वत:ला वाचवण्यासाठी तलवारही हातात घेते. तू या पात्रात जीव ओतला आहेस. समर्पण, कठाेर मेहनत आणि प्रामाणिकपणा तुझ्या पात्रातून दिसत आहे. तू इतकी चांगली अभिनेत्री झालीस यावर माझा विश्वास बसत नाहीये. या पत्रासोबत नूपुरने एक नोटही जोडली आहे. तिने लिहिले.., मी बहीण म्हणून कृतीला चंागले म्हणत नाही. तुम्हीदेखील चित्रपट पाहा आणि त्या पात्राचे काम पाहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.