Home | Divya Marathi Special | nurpur bedi-school

सस्कौरची शाळा सर्वार्थाने आदर्श

गौरव राणा नुरपूरबेदी | Update - May 25, 2011, 12:38 PM IST

शाळेची स्वच्छ, सुंदर इमारत, शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच डोळ्यांना दिसणारी झाडा-फुलांची हिरवळ, भिंतींचादेखील कलात्मकतेने वापर करून घेत

  • nurpur bedi-school

    शाळेची स्वच्छ, सुंदर इमारत, शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच डोळ्यांना दिसणारी झाडा-फुलांची हिरवळ, भिंतींचादेखील कलात्मकतेने वापर करून घेत त्यावर रंगवलेली माहिती आणि मुख्य म्हणजे शाळेची शिस्त पाळणारी मुले, खेळाचे नीटनेटके मैदान या सर्व वर्णनावरून हे एखाद्या खासगी शाळेचे वर्णन असावे, असे वाटते. मात्र सरकारी शाळेविषयीच्या सर्व परंपरागत समजुतींना फाटा देणारी ही आहे नुरपूरबेदी ब्लॉकमधील सस्कौर इथली सरकारी शाळा.

    शाळेत एकूण १२१ विद्यार्थी आणि सहा शिक्षक आहेत. मात्र शिक्षक कमी असले तरी शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो, असे शाळेचे मुख्याध्यापक केसर राम बंैस यांनी सांगितले. शाळेतील विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नसल्याचेही बैंस यांनी सांगितले. पुस्तकी ज्ञानासोबतच इथल्या विद्याथ्र्यांना प्रयोगशील बनवण्याच्या दृष्टिकोनातून या शाळेत एक सायन्स पार्कही उभारण्यात आले आहे.

    या जिल्ह्यातील ते एकमेव सायन्स पार्क आहे. विशेष म्हणजे या शाळेत एकही नोकर अथवा सफाई कामगार नाही, पण तरीही या शाळेची स्वच्छता आणि नीटनेटके व्यवस्थापन पाहिले की थक्क व्हायला होते. विद्याथ्र्यांना मैदानी खेळ खेळता यावेत यासाठी भव्य मैदानही या ठिकाणी आहे.
    विद्याथ्र्यांना सतत ज्ञान आणि माहिती मिळत राहावी या दृष्टिकोनातून इथल्या भिंतींचाही कलात्मकतेने वापर करण्यात आला आहे. विविध रंगांच्या वापरातून आकर्षकपणे इथल्या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. या भिंतींवर जिल्ह्याचा, देशाचा आणि जगाचा नकाशा रंगवण्यात आला आहे. त्याचबरोबर देशाला स्वातंंत्र्य मिळाल्यापासूनच्या देशाच्या राष्ट्रपतींची नावे, विविध देश आणि त्यांच्या राजधानीच्या गावांची नावेही इथल्या भिंतींवर रेखाटण्यात आली आहे.

Trending