आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम्सच्या नर्सने इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे प्रकार पाहीले, नंतर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून केली सुसाइड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर(राजस्थान)- एम्स हॉस्पिटलच्या महिला नर्शने शनिवारी रात्री आठ वाजता ऑपरेशन थिएटरजवळ स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आतत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने इंटरनेटवर अनेक आत्महत्या करण्याच्या पद्धती आणि त्यातून वाचण्याचे उपाय पाहीले होते. ती एक महिन्यापूर्वीच आपल्या गावावरून परतली होती आणि तेव्हापासूनच ती तणावाखाली होती.

 

एसीपी(पश्चिम) चैनसिंह महेचा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आठ वाजता शास्त्री नगर पोलिस स्टेशन अधिक्षक रमेश शर्मा यांना सूचना मिळाली होती की, एम्स हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एका महिला नर्सने आत्महत्या केली आहे. बीजी पिनोस(25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हॉस्पीटलच्या ओपीडी विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर बी-ब्लॉकच्या ओटी स्टोर रूमच्या पाठीमागे महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला. मृतदेहाजवळ प्लास्टिक बाटली आणि एक माचिसही मिळाली. पोलिसांना संशय आहे की, केरोसिन किंवा इतर कोणता ज्वलनशील पदार्थ ओतून तिने स्वतःला पेटवून घेतले असेल. ती ऑगस्ट 2017 पासून येथे कार्यरत होती.


हॉस्पीटलच्या गार्डनी आग लागल्याची सूचना दिली होती
पोलिस अधिक्षक शर्मा यांनी सांगितले की, घटना तिसऱ्या मजल्यावर घडली. या बिल्डींगच्या पाठीमागे एम्सचे लॉन आणि इतर ईमारती आहेत. रात्री 8 वाजता एम्सच्या एका गार्डने ओटीमध्ये आग लागल्याची सूचना दिली. एम्सचे सर्व फायरमॅन आगीकडे धावले, पण स्टोरचे दार आतून बंद होते. एक फायरमॅन दुसऱ्या रुमच्या कॉरिडूअरमधून स्टोर रूममध्ये पोहचला. त्यांनी आग विझवण्याच्या उपकरणांनी आग विझविली पण तोपर्यंत तरुणी जळाली होती.


भाऊ मूक-बधिर, आईचा झाला आहे मृत्यू
पिनोससोबत काम करणाऱ्या इतर स्टाफने सांगितले की, तिच्या आईचे निधन झाले आहे. एक भाऊ आहे, पण तो मूक-बधित आहे. तर वडील पिनोस टीए केरळमध्येच राहतात.