Home | International | Other Country | nurse discovers her new doctor was premature baby she saved 28 years ago

28 वर्षांपूर्वी Nurse ने ज्या बाळाचा जीव वाचवला, त्याच रुग्णालयात तो Doctor होऊन परतला...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:46 PM IST

कॅलिफोर्नियातील ल्यूसल पॅकर्ड बाल रुग्णालयात 1990 मध्ये अतिशय गंभीर अवस्थेत एका मुलाला दाखल करण्यात आले होते.

  • nurse discovers her new doctor was premature baby she saved 28 years ago

    इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका रुग्णालयामध्ये नवीन डॉक्टरची भरती झाली. त्या नवीन डॉक्टरने जॉइनिंग करताच तेथील एका नर्सची भेट घेऊन तिला आपले नाव सांगितले. सुरुवातीला तिला काहीच कळाले नाही, पण यानंतर तिला याच रुग्णालयात 28 वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आठवला आणि तिच्या डोळ्यात आश्रू तरळले. ती इतकी भावूक झाली की तिने हसऱ्या चेहऱ्यासह त्या डॉक्टरला घट्ट मिठी दिली. हा डॉक्टर तोच मुलगा होता ज्याचा जीव वाचवण्यासाठी नर्सने दिवसरात्र मेहनत घेतली होती. तोच मुलगा आता तिच्यासोबत या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणार आहे.


    कॅलिफोर्नियातील ल्यूसल पॅकर्ड बाल रुग्णालयात 1990 मध्ये अतिशय गंभीर अवस्थेत एका मुलाला दाखल करण्यात आले होते. बाळाला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. शरीरातील अंतर्गत अंगांची वाढ व्यवस्थित न झाल्याने त्याला अत्यंत काळजीची गरज होती. अवघ्या 29 आठवड्यात जन्मलेल्या प्री-मॅच्योर बेबीची विल्मा नावाच्या नर्सने खूप काळजी घेतली. तब्बल एक महिना तिने रुग्णालयात जागरण करून त्या बाळाची सेवा केली. तिने केलेल्या सेवेमुळेच तो मुलगा वाचला आणि मोठा होऊन बालरोग तज्ञ बनला.


    पहिल्यांदा नाव कळाले तेव्हा...
    रुग्णालयात नव्याने जॉईन झालेले डॉक्टर ब्रँडन सेमिनातोर यांना चाइल्ड न्युरोलॉजी विभाग मिळाले होते. याच विभागात विल्मा सुद्धा लहान मुलांची देखभाल करत होती. ब्रँडन पहिल्या दिवशी रुग्णालयात आले तेव्हाच त्यांनी मुलांची तपासणी सुरू केली. आपल्या रुग्णालयात नवीन डॉक्टर आल्याचे पाहता ओळख व्हावी या निमित्ताने विल्माने त्यांना नाव विचारले. नाव आणि अडनाव ऐकूण विल्माला ते माहितीत असलेले वाटले. यानंतर तिने डॉक्टरांना घरचा पत्ता आणि आई वडिलांचे नाव विचारले. उत्तर ऐकूण आनंदात विल्माचे डोळे पाणावले आणि छाती भरून आली. ब्रँडनला 28 वर्षांपूर्वीचा किस्सा कळ्यानंतर तो देखील भावूक झाला. या दोघांची स्टोरी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trending