आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या प्रेमाचे नाटक करुन डॉक्टरने नर्सला केले प्रेग्नंट, बायको सोबत मिळून केले हे घृणास्पद कृत्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाल- शाहपूर भागात बेकायदेशीर गर्भपाताची घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका डॉक्टरने आपल्याकडे काम करत असलेल्या नर्सला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रेग्नंट केले . त्यानंतर आपल्या पत्नी सोबत मिळुन तिचा बेकायदेशीरित्या गर्भपात केला. 


लग्नाचे वचन देऊन लिव इन मध्ये राहात होता 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला डॉ.कपिल सोबत लिव इन रिलेशनमध्ये राहत होती. महिलेने डॉ.कपिल लाहोटी आणि डॉ.सीमा यांच्या विरुध्द बेकायदेशीर गर्भपात केल्याची तक्रार केली आहे. त्या महिलेने सांगितले की, डॉ.कपिलने लग्न करेल असे सांगितले त्यामुळे आम्ही लिव इन मध्ये राहु लागलो. त्यादरम्यान कपिलने तिच्या सोबत आत्याचार केला. जेव्हा ती  प्रेग्नंट असल्याचे कळले तेव्हा आरोपींनी जबरदस्तीने त्या महिलेचा गर्भपात केला. महिलेच्या तक्रारवरुन डॉ.कपिल लाहोटी आणि डॉ.सीमा लाहोटी यांना अटक  करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...