आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nusrat Bharucha Had Accidentally Gone To The Men's Toilet, The Actress Revealed Herself

चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली होती नुसरत भरूचा, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : नुसरत भरूचा सध्या आपला आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल' साठी चर्चेत आहे. या चित्रपटात नुसरत, आयुष्मान खुराना सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. प्रमोशनदरम्यान नुसरतने सांगितले की, तिने एक अशी चूक केली होती ज्यामुळे ती आजही खजील होते. 
 
 
नुसरत भरूचाने या गोष्टीचा खुलासा स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. झाले असे की, 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही मजेदार सीन्स आहेत. आपल्या आयुष्यातील अशाच एका घटनेबद्दल जेव्हा नुसरतला विचारले गेले तेव्हा तिने मोठा खुलासा केला. नुसरत भरूचा म्हणाली की, 'हो, माझ्यासोबतही असेच काही झाले होते. मी एकदा चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते. हे तरी बरे झाले की, आत कुणीही नव्हते. मग मी लवकरच बाहेर आले. आजकाल महिला आणि पुरुषांच्या टॉयलेटच्या दरवाज्यांवर वेगवेगळ्या डिजाइन बनवलेल्या असतात. अशावेळी ओळखणे खूप कठीण होऊन जाते.'