• Home
  • Gossip
  • Nusrat jaha goes for taking oath in the Parliament wearing the saree given by husband Nikhil, nusarat tells about there Love Story

Bollywood / पती निखिलने गिफ्ट दिलेली साडी नेसून संसदेत पोहोचली होती नुसरत, स्वतः सांगितले आपली लव्हस्टोरी कशी सुरु झाली  

निखिलने कारमध्येच केले होते प्रपोज

दिव्य मराठी वेब

Jul 04,2019 04:51:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहांने 19 जूनला टर्कीमध्ये ब‍िजनेसमन न‍िख‍िल जैनसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचे ग्रँड सेल‍िब्रेशन खूप चर्चेत होते. पण नुसरत जहांची लव्हस्टोरी केव्हा आणि कशी सुरु झाली ? याचे उत्तर आता स्वतः नुसरत आणि निखिल यांनीच एका इंटरव्यूमध्ये दिले. त्यांनी सांगितले कशी त्यांची पहिली भेट झाली आणि कशी त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

द टेलीग्राफला दिलेल्या इंटरव्यूमध्ये निख‍िल जैनने सांगितले की, 'आमची भेट तीन वर्षांपूर्वी एका शूटदरम्यान झाली होती. पण तेव्हा माझा असा काही अप्रोच नव्हता की, आम्ही आज ज्या नात्यामध्ये आहोत तिथे असू.' नुसरतने सांगितले की, मी तर न‍िख‍िलला जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाच त्याच्या पर्सनाल‍िटीवर इम्प्रेस झाले होते.

नुसरतने सांगितले, "पहिल्यावेळी तर मला न‍िख‍िलला भेटू हेच वाटले होते की, कॅस‍िनोवा टाइप पर्सन आहे. कदाचित त्यानेही माझ्याबद्दलहि काही वाईटच ऐकले असेल कारण ज्या प्रोफेशन मध्ये मी आहे, तिथे अशा गोष्टी होत राहतात. कोणत्याही माणसाला भेटण्यापूर्वी गरजेच्या असतात त्याच्या वाइब्स. तसे न‍िख‍िलचे मित्र तर म्हणतात की, तो आता पूर्णपणे बदलला आहे."

नुसरतने सांगितले की, "पहिल्यांदा न‍िख‍िलने आपल्या बर्थडेच्यावेळी मला प्रपोज केले होते. तसेही आम्ही तेव्हा कॉलेज गोइंग एजमध्ये नव्हतो. त्यानंतर अनेक भेटी झाल्या आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला."

नुसरतने सांगितले, "न‍िख‍िल माझ्यासाठी खूप खास आहे. मला माझ्या पेरेंट्सप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी तो प्रेरित करतो. जसे की, जेव्हा मी खासदार पदाची शपथ घ्यायला जाणार होते तेव्हा मी न‍िख‍िलने दिलेली साडी घातली होती. ही साडी त्याने मला तेव्हा दिली होती जेव्हा मला टीमएसी खासदार म्हणून निवडले गेले होते."

नुसरतने सांगितले की, "न‍िख‍िल खूप रोमँटिक आणि सरप्राइज देणारा आहे. नुसरत म्हणाली मात्र जास्तीत जास्त सरप्राइज नेहमी शॉकमध्येच रूपांतरित होतात." नुसरत पुढे म्हणाली, "न‍िख‍िलने मला अचानकच प्रपोज केले होते. न‍िखिलने सांगितले, आम्ही दोघे त्या दिवशी कारमध्ये होतो, मी व्हिक्टोर‍िया मेमोर‍ियलजवळ गाडी थांबवली आणि नुसरतला प्रपोज केले. हो, रिंग आधीपासूनच मी माझ्या खिशात ठेवली होती." नुसरत म्हणाली, 'न‍िख‍िल खूप चांगला प्लॅनर आहे, त्याने लग्नाचे पूर्ण नियोजन केले होते.'

लग्नानंतर सर्वात मोठा बदल काय झाला. या प्रश्नावर नुसरत म्हणाली, "सर्वात मोठा बदल हा चुडा आहे. जेव्हा मी लग्नानंतर सकाळी उठले तेव्हा हातात हा चुडा पाहाणे आणि नवे घर. हा सर्वात मोठा बदल होता." तर न‍िख‍िल म्हणाल, "सकाळी उठून नुसरतला पाहाणे सर्वात जास्त आनंद देते. हाच सर्वात मोठा बदल आहे."

X
COMMENT