आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबांना ब्लँकेट वाटतानाचा व्हिडिओ शेअर केल्याने ट्रोल झाली नुसरत, लोक म्हणाले- व्हिडिओ बनवण्याची काय गरज होती?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहांने गोरगरीबांना ब्लँकेट वितरित केले. तिने ब्लँकेट्स वितरित करत असतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, या व्हिडिओत नुसरत आणि तिचा नवरा निखिल ब्लँकेट वितरित करण्यासाठी कॉलनीत पोचतात आणि लोक ब्लँकेट मिळाल्याने आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करुन नुसरतने लिहिले - "प्रत्येक उत्सव स्वतःबरोबर आनंद घेऊन येतो. प्रत्येकाला आपल्या प्रेमाने बांधून ठेवा. वंचितांपासून ते सेक्स वर्करपर्यंत प्रत्येकजण आनंदास पात्र असतो. दयाळूपणा मुक्त आहे, म्हणून तो सर्वत्र पसरवा.

  • लोक ट्रोल करीत आहेत

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या उपक्रमाबद्दल काहीजण नुसरतचे कौतुक करीत आहेत तर काहींनी ब्लँकेट्स वाटप करताना बनवल्या गेलेल्या व्हिडिओवर संताप व्यक्त करुन नुसरतला ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले - "याला शूट करण्याची काय गरज होती ?? आपण लोकांना हे दर्शवू इच्छित आहात, आपण किती दयाळू आहात? चांगला प्रसिद्धी स्टंट." आणखी एका यूजरने लिहिले -"समाज कार्य ही एक चांगली गोष्ट आहे आणि मला त्याची कदर आहे पण तुला प्रसिद्धी हवी आहे का?"  आणखी एका यूजरने लिहिले - "कृपया हे चांगले काम दाखवू नका. तू जे करत आहे, ते खूप चांगले कार्य आहे. पण हे कार्य कॅमेर्‍याविना करता येईल.”  तर काहींनी नुसरतच्या कार्याचे कौतुक केले आहे.  एका यूजरने लिहिले - 'आम्हाला तुमचा अभिमान आहे.'  आणखी एका यूरजने लिहिले - "देव तुम्हाला आनंदी ठेवो, आपण एक चांगले काम करत आहात."

  • बशीरहाटची खासदार आहे नुसरत

बंगाली मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नुसरतने 2011  मध्ये 'शोत्रू' चित्रपटाद्वारे स्थानिक चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिने आतापर्यंत 18 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये, ती राजकारणात सक्रिय झाली आणि तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधील बशीरहाट जागेवरून लोकसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत तिने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतान बसू यांचा सुमारे 3.50 लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर तिने प्रसिद्ध उद्योगपती निखिल जैनशी लग्न केले.  दुस-या धर्मात लग्न केल्याने तिला काही मुस्लिम संघटनांनी लक्ष्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...