आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nusrat Who Has Been Seen Worshiping Jagannath With Mamata Banerjee, Has Recently Become The TMC MP

पेहरावावरून झाली होती टीका, आता ममतांसोबत जगन्नाथाची पूजा करताना दिसल्या खासदार नुसरत जहां

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली अभिनेत्री नुसरत जहां लग्नानंतर खूप चर्चात आहे. नुसरत आणि तिचा पती निखिल 4 जुलैला कोलकातामध्ये मोठे रिसेप्शन देणार आहेत. ग्रँड रिसेप्शनपूर्वी नुसरतचे कोलकाताच्या इस्कॉन मंदिरामध्ये पूजा-अर्चना करतानाचे फोटोज समोर आले आहेत. नुसरतचे हे फोटोज सोशल मीडियावर खूब व्हायरल होत आहेत. आज देशातील अनेक भागांमध्ये जगन्नाथाची रथ यात्रा काढली जात आहे. या खास प्रसंगी नुसरत आपला पती निखिल जैनसोबत पोहोचली होती. ममता बॅनर्जींसोबत नुसरतनेदेखील तेथे पूजा केली. 

 

 

नुसरत 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बसीरहाट सीटवरून निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार बनली आहे. खासदार म्हणून जेव्हा नुसरत शपथ घेण्यासाठी लोकसभेत पोहोचली होती तेव्हा ती खूप चर्चेत राहिली होती. याचे कारण होते तिच्या भांगेतील सिंदूर आणि हातातील चुडा. हे काही मौलवींना आवडले नाही आणि त्यांनी नुसरतविरुद्ध फतवा काढला. मात्र नुसरतने यावर योग्य उत्तर दिले. ती म्हणाली, 'मी जन्मतः मुसलमान आहे. माझ्याबद्दल विनाकारण वाद केले जात आहेत. मी प्रत्येक धर्माचा सन्मान करते.'