आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज केवळ मुख्यमंत्री आणि 6 मंत्र्यांचा शपथविधी, त्यानंतर उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ विस्तार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी विधानसभा अध्यक्षांची निवड, मग उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ विस्तार
  • राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा शपथविधी निश्चित
  • मी आज मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह केवळ 6 मंत्री आज शपथ घेतील. यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्र्यांना शपथ दिली जाणार अशी चर्चा होती. परंतु, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी केवळ 6 मंत्री शपथ घेणार असे स्पष्ट केले. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांचा समावेश राहील. शपथविधीनंतर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. बहुमत चाचणी झाल्यानंतर मंत्र्यांचा खातेवाटप होईल असेही सांगण्यात आले आहे.

मी आज मंत्रिपदाची शपथ घेणार नाही -अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारमध्ये समाविष्ट होत असल्याचे स्पष्ट केले आहे. "उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत 6 इतर नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 नेत्यांचा समावेश राहील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतली. आज मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही." असे अजित पवारांनी सांगितले आहे. तत्पूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. परंतु, त्यांचा शपथविधी आणि यासंदर्भातील औपचारिक घोषणा नंतर केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...