Scholarship / दहावीपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार ही शिष्यवृत्ती, यंदापासूनच होणार लागू

भटक्या विमुक्तांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती लागू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

प्रतिनिधी

Jun 10,2019 09:45:00 AM IST

सिन्नर - इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्राने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. ही योजना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळत होती. यासाठी संबंधीत विद्यार्थ्याच्या पालकांची कमाल उत्पन्न मर्यादा २ लाख ५० हजार रुपयांच्या आत आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल.


भटक्या विमुक्तांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती : विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी (डीएनटी) केंद्राने लागू केलेली डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजनाही राज्य शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा मिळणार लाभ
१० महिने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अनिवासी विद्यार्थ्यांसाठी महिना १०० रु. व तदर्थ अनुदान (वार्षिक) ५०० रु. अशी एकूण १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. तर इयत्ता ३ री ते १० वी निवासी विद्यार्थ्यांसाठी महिना ५०० रु. व तदर्थ अनुदान ५०० असे एकूण ५५०० रुपये मिळतील.

X
COMMENT