आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

184 किलो वजनाने वैतागली होती व्यक्ती, लठ्ठपणामुळे सोडून गेली पत्नी आणि मोडले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉनसन. अमेरिकेमध्ये एक सॉफ्टवेअर इंजीनियर लठ्ठपणामुळे खुप वैतागला होता. लठ्ठपणांमुळे त्याला मोठा बेड लागत होता, त्याला सॉक्स घालणेही अवघड होत होते. यामुळे त्याचे वैवाहिक आयुष्य उध्वस्त झाले आणि बायकोनी घटस्फोट दिला. यानंतर या तरुणाने वजन कमी करण्याचा आणि फिट राहण्यासाठी निर्णय घेतला. अवघ्या दोन वर्षात त्याने आपले वजन एवढे कमी केले की, त्याला ओळखणेही कठीण जात होते. 


लठ्ठपणाने उध्वस्त केले लग्न 
- टेनेसी स्टेटच्या जॉनसन सिटीमध्ये राहणा-या 38 वर्षाचा स्टीफन ऐकेकाळी सुपर फिट पावर लिफ्टर होता. परंतु खाणे आणि नाष्ट्यामध्ये फक्त फास्ट फूड खाण्याच्या सवयीमुळे त्याचे वजन वाढत गेले. 
- स्टीफननुसार, तो नेहमीच लंच आणि डिनरमध्ये मॅकडोन्लाड पिज्जा किंवा बिग फॅमिली मील ऑर्डर करायचा, एका व्यक्तीने हे पदार्थ खाणे शक्य नसते. 
- त्याने सांगितले की, मी जेव्हा हे सर्व पदार्थ संपवायचो, त्यानंतर मला वाईट वाटायचे. मी यानंतर असे करणार नाही असे ठरवायचो. परंतु पुढेही हे असेच सुरु राहिले. 
- स्टीफननुसार, यामुळे त्याचे वजन वाढत गेले आणि आणि तो 184 किलोंचा लठ्ठ व्यक्ती झाला. यामुळे त्याला चालणे-फिरणे आणि बसणेही अवघड झाले.
- तो म्हणाला की, लठ्ठपणामुळे माझे वैवाहिक आयुष्य उध्वस्त झाले. आम्हाला रिलेशन बनवणेही अवघड झाले. यामुळे तो डिप्रेस राहू लागला. 
- स्टीफनने सांगितले की, मी बायकोसोबत न्यूयॉर्क फिरायला गेलो तेव्हा हे सत्य समोर आले. तिथे सेंट्रल पार्कमध्ये थोडा वेळ चालल्यानंतरही मी पुन्हा उठू शकलो नाही. 
- त्याने सांगितले की, मी स्वतःला एक अयशस्वी व्यक्ती म्हणून पाहू लागलो. माझे लग्न मोडायला आले. शेवटी माझ्या बायकोने मला घटस्फोट दिला आणि मी एकटा पडलो. 


नंतर जिममध्ये परतलो 
- अक्टोबर 2016 मध्ये मी पुन्हा जिमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला येथे वर्कआउट करणे अवघड झाले. पण काही दिवसांनंतर माझ्यामध्ये जुना पावर लिफ्टर जागा झाला.
- स्टीफनने सांगितले की, मी पुन्हा रोज जिम जाण्यास सुरुवात केली आणि आपल्या खाण्यापिण्याच्या रुटीनमध्ये सुधारणा केली. मी सकाळनंतर संध्याकाळी फक्त 5 ते 9 वाजेदरम्यान जेवण करायचो आणि फक्त घरचे जेवण करायचो.
- त्याने सांगितले की, डिनरमध्ये फक्त लो फॅट फूड घेत होतो. यामध्ये पॉपकार्न किंवा लो फॅट आइस्क्रीम असायची. यामुळे दोन वर्षात माझे 184 किलो वजन 100 किलोंवर आले.
- स्टीफननुसार, आता मी पहिल्यासारखा पुर्णपणे फिट आहे आणि आपली लाइफ एन्जॉय करतोय. मी पहिल्यापेक्षा जास्त कॉन्फिडेंट आहे. परंतु आताही मी डेटसाठी पुर्णपणे तयार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...