Home | Maharashtra | Pune | objection of organizations for Saturnarayan pooja in Fergusson

फर्ग्युसनमध्ये सत्यनारायण पूजेला संघटनांचा अाक्षेप; प्राचार्य म्हणतात, ही तर ४० वर्षांपासूनची परंपरा

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 07:06 AM IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील मुख्य इमारतीच्या कार्यालयात दरवर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे अायाेजन करण्यात येते.

 • objection of organizations for Saturnarayan pooja in Fergusson

  पुणे- फर्ग्युसन महाविद्यालयातील मुख्य इमारतीच्या कार्यालयात दरवर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे अायाेजन करण्यात येते. त्यानुसार शुक्रवारीही ही पूजा अायाेजित करून महाविद्यालयाच्या फळ्यावर 'सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा', असे अावाहन करण्यात अाले हाेते. मात्र, यंदा काही विद्यार्थी संघटनांनी त्याला अाक्षेप घेतला. 'शैक्षणिक संस्थेत केवळ एकाच धर्माचे उदात्तीकरण व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जात अाहे,' असा अाराेप करत त्यांनी प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी केली.


  प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी म्हणाले, 'श्रावण महिन्याच्या निमित्ताने मागील ४० वर्षांपासून दरवर्षी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायण पूजेचे अायाेजन करण्यात येते. मात्र काही संघटनांच्या वतीने अकारण वाद केला जात अाहे. या महाविद्यालयाची मालकी शासनाची नसून एका विश्वस्त संस्थेची आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या नियमानुसार कामकाज चालत असते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमास परवानगी द्यायची की नाही हा पूर्णपणे त्या संस्थेचा अधिकार अाहे'.


  एकोपा वाढवणारा उपक्रम : अभाविप
  सत्यनारायण पूजा हा परंपरेने चालत अालेला सामाजिक एकाेपा वाढवणारा उपक्रम अाहे. त्यामुळे हा कार्यक्रम तशाच पद्धतीने साजरा हाेत असेल तर यात हरकत असण्याचे कारण नाही. अभाविप म्हणून या पूजेला विराेध किंवा पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसून हा संबंधित महाविद्यालयाच्या अावारातील त्यांच्या कर्मचारी वर्गाचा अंतर्गत विषय अाहे. अशा कार्यक्रमास एक सामाजिक संघटना म्हणून विराेध असण्याचे कारण नाही. अशा पद्धतीने विराेध हाेत असेल तर अापण विवेक हरवून बसलाे अाहाेत, अशी भूमिका अभाविपतर्फे स्पष्ट करण्यात अाली.


  ही प्रथा थांबवावी
  शासकीय अनुदान घेणाऱ्या महाविद्यालयात एकाच धर्माचे कर्मकांड केले जाणे हे चुकीचे अाहे. अंनिस अशा कृत्याचे कधीही समर्थन करत नाही. सत्यनारायण पूजा अनेक सरकारी कार्यालय, पाेलिस स्टेशन, मंत्रालयात करण्यात येते. ही प्रथा थांबवली पाहिजे. -मिलिंद देशमुख, अंनिस, कार्यवाह

Trending