Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | The first love has beat second love; Occasion of MLA Todsam's birthday freestyle between his two wife

'व्हॅलेंटाइन डे' असाही, पहिल्या प्रेमाने दुसऱ्या प्रेमाला बदडले; आमदार तोडसाम यांच्या वाढदिवशी दोन पत्नींत फ्रीस्टाइल! 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 08:10 AM IST

व्हॅलेंटाइन डेच्या तोंडावर पांढरकवड्यात त्रिकोणाच्या कोनातच जुंपली 

 • The first love has beat second love; Occasion of MLA Todsam's birthday freestyle between his two wife

  यवतमाळ- व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला सर्वत्र प्रेमी युगुलांच्या प्रेमासाठी आणाभाका सुरू असताना पांढरकवडा येथे मात्र आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवशी प्रेमातील त्रिकोणाच्या दोन बाजूंत जबर जुंपली. अर्थात या आमदारांच्या दोन पत्नींत भररस्त्यात कडाक्याचे भांडण झाले. तोंडी पेटलेले भांडण हळूहळू धरपकडीवर आले आणि पहिल्या पत्नीने दुसरीला चपलेने फ्रीस्टाइल झोडपले. याचदरम्यान, दोघींपैकी एकीची बाजू घेत सुमारे ३५ ते ४० जणांचा जमाव सरसावला आणि या हल्ल्यात आमदारही जखमी झाले.

  मंगळवारी रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रेमाचा भंगलेला कोण' कानोकान' पोहोचला. घडले असे की, आ. तोडसाम यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने कबड्डीचे राष्ट्रीय सामने आयोजित करण्यात आले होते. आमदार महोदयांचे कुटुंबही अर्थात त्यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहतात, या कारणावरून कबड्डीच्या मैदानावर दोन्ही पत्नींमध्ये जुंपली आणि पहिल्या पत्नीसोबत असलेल्या ३०-४० जणांनी आमदारांना घेरले. हुतूतूच्या खेळासारखेच जमावाने आमदारांना टच लाइन (पळून जाण्याची संधी न देता) गाठू न देता गाडीत बसवून डांबून ठेवले आणि दुसरीकडे दोन्ही पत्नींमध्ये जोरदार हाणामारी झाली.

  दुसरी पत्नी प्रिया म्हणाली, माझा दोष काय?
  आमदारांची दुसरी पत्नी प्रिया यांना याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, आमचे दोघांचे प्रेम आहे. आम्ही रीतसर लग्न केले आहे. दीड वर्षापूर्वी पहिल्या पत्नीला यांनी सोडचिठ्ठी दिली. दीड वर्षापासून ते वेगळे झालेले आहेत. असे असताना हा प्रकार अचानक घडला. इतके दिवस कोणीच काही बोलले नव्हते. मोठ्या माणसाला बदनाम करण्यासाठी असे उद्योग सुरू आहेत. याशिवाय यात दुसरे काही कारण दिसत नाही.

  कारण काय? :
  आमदार तोडसाम दुसरी पत्नी प्रियासोबत राहतात. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करून संसार थाटल्याचा पहिलीचा आरोप आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी भाजप कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे एकत्र असतात. त्यामुळे पहिल्या पत्नीला असूया होती. याबाबत आमदारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर पहिल्या पत्नीनेही आपण बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगितले.

Trending