मारुती सुझुकी, डिझायर / मारुती सुझुकी, डिझायर किंवा बलेनो नाही....तर ही आहे भारतातील बेस्ट सेलिंग कार, किंमत फक्त 2.53 लाख रूपये आणि मायलेज 33 किमी पेक्षा जास्त

दिव्य मराठी वेब टीम

Nov 11,2018 10:49:00 AM IST
ऑटो डेस्क - ऑक्टोबर 2018 मध्ये मारुती सुझुकीची कार पुन्हा एकदा विक्री यादीत सर्वोत्तम ठरली आहे. Cumulative Sales Report October 2018' नुसार, टॉप -10 यादीत मारुतीच्या 7 मॉडेल्सचा समावेश आहे. यापैकी पहिल्या 5 स्थानांवर मारुती कार आहेत. गेल्या महिन्यात दुसऱ्या स्थानावर असलेली Alto पहिल्यांदा सर्वोच्च स्थानी पोहचली आहे. तर दुसऱ्या स्थानी Baleno आहे.
एका अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात एकूण 22,180 Alto विकल्या गेल्या आहेत. गेल्या महिन्यात 21,719 Alto कार विकल्या गेली होती. यावेळी 461 जास्तीच्या Alto विकल्या गेल्या आहेत.
ऑक्टोबर टॉप-10 सेलिंग लिस्ट
रँक मॉडल यूनिट सेल
1 Maruti Alto 22180
2 Maruti Baleno 18657
3 Maruti Dzire 17404
4 Maruti Swift 17215
5 Maruti Brezza 15832
6 Hyundai i20 Elite 123290
7 Hyundai i10 Grand 11820
8 Hyundai Creta 11702
9 Maruti WagonR 10655
10 Maruti Celerio 9260
Alto 2 इंजिनमध्ये उपलब्ध
मारुती सुझुकी भारतातील बेस्ट सेलिंग कार कंपनी आहे. या कंपनीची कार मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बजेटमध्ये असून मेंटनंसच्या नावाखाली जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. म्हणूनच टॉप 10 यादीत मारुतीच्या 7 कार समाविष्ट आहेत. मारुती आल्टो 800 सीसी आणि 1000 सीसी इंजिनमध्ये येते.
कमी किंमत, जास्त मायलेज
Alto 800 LXI आणि VXI या दोन मॉडेलमध्ये येते. हे दोन्ही मॉडेल पेट्रोल आणि सीएनजी मध्ये वेगवेगळे येते. STD मॉडेलची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 2.53 लाख आहे. आणि LXI CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.73 लाख आहे. कंपनीचा दावा आहे की पेट्रोल मॉडेलचे मायलेज 24.70 kmpl आहे आणि LXI CNG चे मायलेज 33.44 किलोमीटर आहे. दिल्लीमध्ये CNG किंमत 41 रुपये प्रति किलो आहे. अशा प्रकारे, ALTO 800 CNG चे मायलेज 1.22 रूपये प्रति किलोमीटर येते. ALTO 800 LXI CNG ची एक्स-शोरूम किंमत 3.71 लाख रुपये आहे.

X
COMMENT