आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात ऑक्टोबर 'हिट', तापमान ३७.७ अंश सेल्सियस; देशात सर्वाधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- परतीच्या पावसाने दगा दिल्याने एकीकडे पिकांना नुकसान झाले. आता 'ऑक्टोबर हिट'मुळे नागरिक हैराण आहेत. १० ऑक्टोबर रोजी देशभरात अकोल्यात सर्वाधिक ३७.७ अंश से. तापमानाची नोंद झाली. 


विदर्भ उष्ण हवामानासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर, खामगाव, पुसद आदी गावांमध्ये उन्हाळ्यात ४८ अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमानाची नोंद होते. ऑक्टोबरमध्येही पारा वाढतो. ऑक्टोबर सुरु झाल्यापासूनच तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. तर १० ऑक्टोबरला चक्क ३७.७ अंश सेल्सियस तापमान होते. अकोल्यानंतर अमरावती ३७.२, वाशीम ३६.२, यवतमाळ, चंद्रपूर ३६.००, वर्धा ३५.९, ब्रह्मपूरी ३५.०० तर गोंदियात सर्वात कमी ३३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

बातम्या आणखी आहेत...