आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - बॉलिवूडमध्ये पुढील ३ आठवड्यांत असे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत ज्यामध्ये प्रमुख पात्र टक्कल असलेले दिसतील. सर्वात आधी २५ ऑक्टोबर रोजी ‘हाउसफुल ४’मध्ये अक्षय कुमार, त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी ‘बाला’मध्ये आयुष्मान खुराणा आणि याच्या दुसऱ्याच दिवशी ‘उजड़ा चमन’मध्ये सनी सिंह टक्कल असलेल्या भूमिकेत दिसतील. इथे जाणून घेऊया कोणत्या चित्रपटासाठी कुणी-कुणी टक्कल केले आहे -
‘हाउसफुल ४’ चित्रपटात अक्षय कुमार दोन लुकमध्ये दिसणार आहे. त्याचा एक लूक १४व्या शतकातील राजकुमार बालाच्या पात्राचा आहे. या लुकमध्ये तो टक्कल असलेला दिसेल. यासाठी त्याला दररोज अडीच तास लागत होते. यादरम्यान त्याचा प्रोस्थेटिक मेकअप होत होता. याशिवाय अनेकदा त्याला पूर्ण मेकअप झाल्यानंतर लुक टेस्टही द्यावी लागत होती.
अक्षयला असे बनवले बाला : अक्षय कुमारला हा लूक देण्यामागे मेकअप आर्टिस्ट प्रीती शील यांची मेहनत आहे. अक्षयला पूर्णपणे बाल्ड लुक देण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. एवढेच नाही तर अक्षयच्या लुकशिवाय त्याच्या पोशाखाचीही समस्या होती. इतिहासावर आधारित चित्रपटासाठी रिम्पल आणि हरप्रीतने त्याचा ड्रेस तयार केला. या दोघींनीही प्रिती शीलप्रमाणे ‘पद्मावत’मध्ये काम केलेले आहे.
इतर लोक सेटवर सात वाजता येत होते. मला पहाटे चार वाजता यावे लागत होते. चित्रपटात माझ्या मेकअपसाठी अडीच ते तीन तास लागायचे. कधीकधी तर चार तासही प्रोस्थेटिकमध्ये जात होते. प्रीती शील आणि त्यांची बहिण सुखमणीने माझा मेकअप केला आहे. दोघींनी भन्साळी आणि अक्षय कुमारसोबत काम केले आहे. त्यादरम्यान मा गाणे ऐकत होतो किंवा नेटफ्लिक्सवर वेब शो पाहत होतो. अनेकदा आपले संवादही पाठ करत होतो. शूट पूर्ण झाल्यानंतर मेकअप उतरवण्यासाठी २० मिनिटे लागायची. प्रोस्थेटिकबाबत खूप चांगला अनुभव होता.
टक्कपणामुळे त्रस्त एका युवकाच्या कथेवर आधारित चित्रपट ‘बाला’साठी आयुष्मान खुराणाने टक्कल करण्याऐवजी स्कल्ड कॅपचा वापर करण्याचा पर्याय निवडला. आयुष्मान म्हणतो, ‘बालामध्ये मी टक्कल केले नाही. कारण या कथेत अनेक वेगवेगळे टप्पे आहेत. मी टक्कल केले असते तर पुढचा लुक टिकवणे कठिण गेले असते. त्यामुळे या चित्रपटात मी स्कल्ड कॅप घालण्याला प्राधान्य दिले. कॅप घालून गेटअपमध्ये येण्यास मला अडीच तास लागत होते.
इंग्लंडचे रहिवासी थॉमस व रुथ रॉय यांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. टक्कल पडल्यानंतरही व्यक्तीने स्वत:वर प्रेम करावे व केअर फ्री राहावे, हा उद्देश त्यांचा होता.
पात्रासाठी यांनी खरोखरच केले टक्कल शाहिद कपूर - हैदर रणवीर सिंह- बाजीराव मस्तानी अंतरा माळी- अँड वन्स अगेन शबाना आझमी - वॉटर
आठवणीतील लूक
अमरीश पुरी- इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम
चर्चेतील अभिनेता
आमिर खान - गझनी
स्टायलिश अभिनेता
रजनीकांत - शिवाजी द बॉस
कुलभूषण खरबंदा - शान
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.