भविष्यातील जकात कपातीच्या / भविष्यातील जकात कपातीच्या श्रेयासाठी चढाओढ सुरू

May 24,2011 05:46:10 PM IST

ठाण्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील जकात कमी करण्यासाठी ठाण्याच्या महापौरांनी प्रयत्न सुरू केले असताना ही जकात कपात झाल्यास त्याचे श्रेय विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचेच असेल , असा दावा कामगार नेते शरद राव यांच्या अध्यक्षतेखालील ठाणे ऑटोरिक्षा मेन्स युनियनने केला आहे . ही कपात झाल्यास डावखरे यांचा जाहीर सत्कार करण्याचा ठरावही युनियनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला .X