आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यावर भटकणाऱ्या बेवारस मुलाला आईने आणले घरी, मुलाला म्हणाली की - त्याला दत्तक घे आणि येथूनच बदलले त्यांचे सगळे आयुष्य; काय आहे प्रकरण जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कालाहांडी : ओडिसामध्ये एक दाम्प्यत्य अनाथ मुलांसाठी देवदून बनून आले आहेत. हे पती-पत्नी जशोदा आश्रमाच्या नावाने अक अनाथालय चालवतात. रस्त्यावर भटकणाऱ्या बेवारस मुलांना आपल्या घरी आणून त्यांचे संगोपण करतात. इतकेच नाही तर या दाम्प्यत्याने मुलांना आपले देखील दिले आहे. एकदा यांची आई रस्त्यावर भटकणाऱ्या बेवारस मुलाला घरी आणले आणि यांनाच तो मुलगा दत्तक घेण्यास सांगितले होते. तेव्हापासून हे दाम्प्यत्य रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ मुलांना आपल्या घरी आणत आहेत. 

 

बेवारस मुलांना घेतात दत्तक

> कालाहांडी जिल्ह्यात श्यामसुंदर आणि त्यांची पत्नी कसूरी दोघांनी 'जशोदा' आश्रमाची स्थापना केली. सामान्य लोकांनी दिलेली देणगी आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीने हे आश्रम चालवत आहेत. 
> सध्या या आश्रमात 23 मुले आणि 113 मुली राहत आहेत. बेवारस मुलांसाठी करत असलेल्या कामामुळे दाम्प्यत्यांचे कौतुक होत आहे.  

> श्यामसुंदर सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईने एका मुलाला रस्त्यावर बेवारसपणे फिरताना पाहिले. त्यांनी त्या मुलाला घरी आणले आणि त्याला दत्तक घेण्यासाठी सांगितले. तेव्हापासून आम्ही हेच काम करत आहोत. 

> रस्त्याच्या कडेला, बस आणि इतर रहदारीच्या ठिकाणा अनके मुले बेवार अवस्थेत आढळतात. त्यांना आम्ही घरी घेऊन येतो. या मुलांमध्ये मुलीची संख्या जास्तप्रमाणात असल्याचे श्यामसुंदर यांनी सांगितले. 

> नवजात मुले कुत्र्याचा शिकार होऊ नये यासाठी आश्रमाच्या बाहेर एक लहान खोली तयार केली आहे. जेणेकरून लोक आपल्या मुलांना तेथे सोडून जाऊ शकतील. यामुळे ते मुल कुत्र्याचा शिकार होणार नाही. असे देखील त्यांनी सांगितले. 

 

12 मुलींचे केले आहे लग्न

> श्यामसुंदर यांनी सांगितले की, देणगीमधून मिळालेल्या पैशातून हे अनाथालय निर्माण करण्यात आले आहे. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेल्यामुळे लोकांच्या मदतीने अनाथ आश्रम उभारण्यात आले. 

> अनाथ आश्रमात आल्यानंतर मुले त्यांच्या बायोलॉजिकल पालकांच्या जागी आमचे नाव वापरतात. तर आश्रमातील 12 मुलींचे आम्हीच लग्न केल्याचे श्यामसुंदर यांनी सांगितले. 

> श्यामसुंदर यांनी सांगितले की, आम्ही लोकांना विनंती केली आहे की, ते त्यांच्या नवजात मुलांना रस्त्यावर सोडण्याऐवजी आमच्या आश्रमात सोडा. जेणेकरून आम्ही त्यांचा सांभाळ करून त्यांना उत्तमप्रकारचे आयुष्य देऊ शकेल.