आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम ब्रांचने जारी केली पालकांसाठी वॉर्निग: व्हॉट्सअपवर ही लिंक पाठवून मुलाची होतेय फसवणूक, राहा Alert

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क: काही दिवसांपुर्वीच ओडिसा क्राइम ब्रांचने पालकांसाठी एक वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये व्हॉट्सअपवर पाठवण्यात येणा-या पोर्नोग्राफिक लिंक्सविषयी पालकांना अलर्ट केले जात आहे. या लिंक्सच्या माध्यमातून मुलांना टार्गेट केले जात आहे. Olivia Hoax नावाने व्हॉट्सअपवर मुलांना टार्गेट करुन मॅसेज पाठवले जात आहेत.

 

पोलिस काय म्हणाले 
पोलिसांनुसार, मॅसेज पाठवणारा असे दाखवतो की, तो आपल्या फ्रेंडचा फ्रेंड आहे. यानंतर तो यूजरसोबत बोलताना पोर्नोग्राफिक वेबसाइट्सच्या लिंक पाठवण्यास सुरुवात करतो. पोर्नोग्राफिक कंन्टेटही पाठवला जातो. हे लोक यंग चिल्ड्रनला आपले टार्गेट करत आहेत. 


पोलिसांचा सल्ला काय आहे 
पोलिसांनी सल्ला दिला आहे की, कोणत्याही अनोळखी नंबरवरुन येणा-या मॅसेजला रिप्लाय करु नका. अशा वेळी पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपले मुलं कुणाशी बोलतात, काय पाहतात हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा आपली मुलं पोर्नोग्राफीच्या जाळ्यात अडकू शकतात.

 

असा मॅसेज तुम्हाला आला तर काय करावे 
- जर कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरुन तुम्हाला मॅसेज आला, तर रिप्लाय करु नका. तुम्ही तो नंबर ब्लॉक केला तर चांगले राहिल. 
- अशा प्रकारचे मॅसेज आल्यावर ते आपल्या मित्रांसोबत शेअर करणे टाळा. 
- जर व्हॉट्सअपवर एखादी संशयास्पद लिंक आली, तर तात्काळ तो नंबर ब्लॉक करा किंवा याची सूचना पोलिसांना द्या.
- पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाइलवर नजर ठेवावी आणि आपले मुलं ऑनलाइन कुणाशी बोलते यावर लक्ष ठेवा. 
- जर तुमचे पाल्य सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असेल तर त्याच्यावर नजर ठेवा. मुलांना सांगा की, एखाद्या अनोळखी नंबरवरुन मॅसेज आल्यावर त्याच्याशी बोलू नका.
- मुलांच्या वागण्यात काही बदल आला, त्याच्या रोजच्या अॅक्टिव्हिटीमध्ये काही बदल दिसला, तर तो स्वतःमध्येच गुंतलेला असतो, अचानक खाणे-पिणे सोडत असेल, तर तात्काळ त्याला मनोरुग्णाकडे घेऊन जा. 
 

बातम्या आणखी आहेत...