आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 नराधमांनी केला विद्यार्थिनीवर सगल 2 दिवस बलात्कार, नंतर मुलीला जंगलात फेकून झाले फरार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चक्रधरपूर(झारखंड)- ओडिसाच्या राउरकेलामध्ये शिकत असलेल्या मुलीवर गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय मुलीला किडनॅप करून तिच्यावर 6 नराधमांनी सलग 2 दिवस बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलीला जंगलात टाकून आरोपी फरार झाले. 1 जानेवारीला मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे पण अजून कोणालाही अटक केलेलनी नाहीये.

 

मुलीने केला खुलासा: मुलीने सांगितले की, ती राउरकेलाच्या एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती 30 डिसेंबरला राउरकेला रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या येण्याची वाट पाहत होती. तिला झारसुगुडा(ओडिसा) जिल्ह्यातील आपल्या घरी जायचे होते. ती वाट पाहात उभी होती तेव्हा तिला एक व्यक्ती भेटला आणि तिच्या भावाचा मित्र आहे असे सांगितले. मुलीला त्याच्यावर विश्वास वाटला, आणि काही वेळानंतर एक ट्रेन आली. त्या व्यक्तीने तिला ती झारसुगुडाची ट्रेन आहे असे सांगून ट्रेनमध्ये चढायला लावले. त्यानंतर ते दोघे ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर तिला बेशुद्ध करून निर्जण ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर 2 दिवस तिच्यावर 6 लोकांनी बलात्कार केला आणि नंतर जंगलात फेकून फरार झाले.


- पोलिसांनी सांगितले की, मुलगी झारखंडच्या चक्रधरपूर परिसरात सापडली. पोलिसांनी त्या परिसरात शोध सुरू केला असून लवकरात लवकर आरोपींनी पकडण्यात येईल असे सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...