आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या मुलांच्या जीवासाठी कोब्राशी भिडली ही डॉगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलांवर एखादे संकट आल्यानंतर आई स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. असे फक्त मनुष्यामध्येच होत नाही तर प्राणीही करतात. ओडिशामध्येसुद्धा अशीच एक घटना घडली आहे. येथे एक डॉगी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्राशी भिडली. दहा मिनिट डॉगी त्या कोब्राशी झुंज देत होती, परंतु रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत कोब्राने दोन पिल्लांंना दंश केला होता.


एका जिन्याखाली राहत होती डॉगी 
ही डॉगी एका घराच्या जिन्याखाली राहत होती. लोकांनी टाकलेल्या अन्नावर ती आपले आणि पिल्लांचे पोट भरत होती. बुधवारी रात्री अचानक तेथे एक कोब्रा नाग आला. डॉगी आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी त्यावर तुटणं पडली. डॉगीच्या वारंवार मोठमोठ्याने भुंकल्यामुळे जवळपासच्या लोकांनी बाहेर येऊन पाहिले. हा सर्व प्रकार पाहून ते चकित झाले आणि त्यांनी सर्पमित्राला बोलावले. परंतु रेस्क्यू करणारे पोहोचेपर्यंत कोब्राने दोन पिल्लांंना दक्ष केला होता आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्पमित्राने त्या सापाला पकडले.

बातम्या आणखी आहेत...