आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Odisha Teenage Girl Gives Birth In School Hostel And Says Forced To Flee To Forest

आठवीच्या मुलीने हॉस्टेलमध्ये दिला बाळाला जन्म, हकलून दिले तेव्हा जंगलात घ्यावी लागली शरण; 6 कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिशातील आदिवासी मुलींच्या एका सरकारी हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला. ती मुलगी फक्त आठवीला आहे. कळस म्हणजे, हॉस्टेल प्रशासनाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी त्या मुलीला तिच्या बाळासह हकलून दिले. त्यामुळे, तिला एका जंगलात शरण घ्यावी लागली. आता मात्र, या प्रकरणी 6 कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे. तसेच मुलीला आणि तिच्या बाळाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर तिच्यावर बलात्काराच्या संशयात एका सीनिअर विद्यार्थ्याला सुद्धा अटक केली आहे.


हॉस्टेलमध्येच दिला मुलीला जन्म
- ही घटना ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात असलेल्या दरिंगबाडी गावात घडली आहे. या ठिकाणी आठवीला शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या मुलीने शनिवारी हॉस्टेलमध्ये एका मुलीला जन्म दिला. त्या मुलीवर अत्याचार झाला असाव किंवा तिला तातडीने डॉक्टरांची गरज आहे याचा हॉस्टेल प्रशासनाने विचारच केला नाही. उलट तिला तिला हॉस्टेलमधून हकलून देण्यात आले. यानंतर मजबुरीने तिला जंगलात शरण घ्यावी लागली. हे धक्कादायक प्रकरण समोर आले तेव्हा पोलिसांनी मुलगी आणि तिच्या बाळाचा जंगलात शोध घेतला. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर तिच्यावर बलात्कार प्रकरणी एका संशयिताला अटक सुद्धा केली.
- हॉस्टेल SC/ST विभागाकडून संचलित केले जात होते. घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली. लोक निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरले. सोबतच, विरोधी पक्षांनी हा राजकीय मुद्दा करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात SC/ST मंत्री रमेश मांझी यांनी सांगितल्याप्रमाणे, या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करणे आणि परिस्थितीवर अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या मुलीची अशी अवस्था कुणी केली आणि हॉस्टेल प्रशासनाला आधीच ही गोष्ट कशी समजली नाही याचा देखील तपास केला जात आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारावर सीनिअर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...