Health / पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी 

कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे....

रिलिजन डेस्क

Jun 25,2019 12:10:00 AM IST

पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने 'मे' हीट सदृश्य परिस्थितीने शरीराची लाहीलाही होते. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे:


- पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा.
- पावसाळ्यात हलका व पौष्टिक आहार घ्या.


- या दिवसात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.
- पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.


- जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या.
- उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
- पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकाचा वापर करा.

X
COMMENT