आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा'च्या खोलीत ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण, आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
वर्षा बंगल्यावरील एका खोलीतील भिंतीवर असा मजकूर लिहिण्यात आला आहे. - Divya Marathi
वर्षा बंगल्यावरील एका खोलीतील भिंतीवर असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीच्या रूमच्या भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. यावर लिहिणाऱ्याचे तोंड काळे झाले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र बंगला सोडताना असे काही लिहिलेले नव्हते, हे गलिच्छ आणि खालच्या पातळीवरचे राजकारण असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी तयार करण्यात आला. रंगरंगोटी सुरू असताना फडणवीसांची मुलगी राहत असलेल्या रूमच्या भिंतींवर अनेक संदेश लिहिल्याचे दिसून आले. यात बीजेपी वुई रॉक, फडणवीस रॉक, बीजेपी अँड शिवसेना वेर फ्रेंड (मे बी स्टिल आर) यासोबतच यूटी व्हू इज, यूटी मीन अशी वाक्ये लिहिल्याचे समोर आले होते. हे संदेश लिहिलेली छायाचित्रे शनिवार सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ठाकरे मातोश्रीवरच राहणार, वर्षाची मात्र जोरात रंगरंगोटी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागपूर येथे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार का, असा प्रश्न दिव्य मराठीने विचारला असता त्यांनी मी मातोश्रीवरच राहीन. फक्त बैठका वा अन्य कामासाठीच वर्षा बंगल्यावर जाईन,' असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षावर राहणार नसले तरी त्यांच्यासाठी बंगला नव्याने सजवण्यात येत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...