Home | Business | Business Special | Offer of online food delivery companies, food order 'cloud kitchen'

ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांची ऑफर, आता ‘क्लाऊड किचन’ अन्नाची ऑर्डर

प्रतिनिधी, | Update - Jul 12, 2019, 10:39 AM IST

ऑनलाइन फूड कंपन्यांचे क्लाऊड किचनमध्ये गुंतवणुकीसाठी सामान्यांनाही प्रोत्साहन

 • Offer of online food delivery companies, food order 'cloud kitchen'

  नवी दिल्ली - रेस्तराँ असो किंवा हॉटेलचे चविष्ट पदार्थ, घराघरापर्यंत पोहोचणाऱ्या ऑनलाइन फूड कंपन्या आता स्वत:च कुकिंग बिझनेसच्या व्यवसायात उतरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या रेस्तराँएेवजी स्वत:च्या क्लाऊड किचनमधील पदार्थांना प्रमोट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी या कंपन्या छोट्या शहरांत भाडेतत्त्वावर क्लाऊड किचन सुरू करत आहेत. कंपन्यांच्या या ऑफरमुळे नव्या उद्योगाला संधी मिळत असून रेस्तराँसमोर नवे संकट उभे राहिले आहे. खर्चाबाबत ऑनलाइन कंपन्यांसोबत स्पर्धा करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे.


  ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झाेमॅटो लोकांना किचनसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास दोन ते चार लाख रुपये प्रतिमहिना उत्पन्न मिळवण्याची ऑफर देत आहे. केवळ दोन ते तीन हजार चौरस फुटांची जागा आणि ३५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवता येत असल्याचे कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे. यात केवळ किचनच्या उभारणीसाठी झाेमॅटोला द्यावे लागणार आहे. अशीच ऑफर उबेर ईट्सदेखील देत आहे. वास्तविक ही ऑफर सध्या भारताऐवजी इतर देश जसे दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मिळत आहे.


  घरी शिजवलेल्या पदार्थांची डिलिव्हरी : स्विगीने याच्याही पुढे जात घरी शिजवलेले पदार्थ पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. ‘स्विगी डेली’ अॅपच्या माध्यमातून तुम्ही घरच्या स्वयंपाकघरात शिजवलेले अन्न किंवा टिफीन सेवा गुरुग्राममध्ये घेऊ शकता. स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेती यांनी सांगितले की, काही महिन्यांत मुंबई आणि बंगळुरूमध्ये ही सेवा सुरू हाेईल.

  २०२३ पर्यंत ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसाय १.१ लाख कोटींचा
  कन्सल्टन्सी संस्था मार्केट रिसर्च फ्यूचरच्या अहवालानुसार भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी बाजार वर्ष २०२३ पर्यंत वार्षिक १.१ लाख कोटी रुपयांचा होईल. शहरात काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याने यामध्ये वाढ होत आहे. ऑनलाइन व्यवसायात २०२३ पर्यंत १६.२ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ९५ टक्के लोक ऑफर आणि सवलतीसाठी तसेच ८४ टक्के लोक वेळ आणि वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करतात.

Trending