आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाला सोन्याचा पाऊण किलो वजनाचा चंद्रहार अर्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - कर्नाटकातील बंगळुरू येथील एका भक्ताने गुरुवारी विठुरायाला २५ लाख रुपये किमतीचा तब्बल पाऊण किलो वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे.  १९८५ नंतर विठ्ठलाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट असल्याचे येथील मंदिर समितीकडून सांगितले जात आहे. एन.जी.राघवेंद्र असे या विठ्ठल भक्ताचे नाव आहे. विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त आहेत.

 

बंगळुरू येथील ते मोठे उद्योजक आहेत. उद्योजक होण्यापूर्वी त्यांनी इंडियन एअरलाइन्स मध्ये नोकरी केली होती. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते पंढरपुराला नियमित वारीला येत आहेत. त्यापूर्वीसुद्धा त्यांनी पाऊण किलो वजनाचे सोन्याचे शाळिग्राम(लक्ष्मीहार) विठ्ठल रुक्मिणीमातेला अर्पण केले होते.  

बातम्या आणखी आहेत...