आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणात विक्री वाढवण्यासाठी दुचाकी कंपन्यांकडून ऑफर्सचा पाऊस; ५ ते १० हजार रु.ची सूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्हाला सणाच्या मुहूर्तावर स्कूटर किंवा दुचाकी खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही चांगली बातमी आहे. गेल्या दीर्घ काळापासून संकटाचा सामना करणाऱ्या ऑटो कंपन्या यादरम्यान दुचाकींची विक्री वाढवण्यासाठी बाजारात त्यांच्या अनेक ऑफर आहेत. 

विश्लेषकांनुसार, उद्योगात दीर्घकाळापासून विक्रीच्या आकडेवारीत घसरणीचा सामना करत आहेत. सणाचा काळ त्यांच्यासाठी बेल आऊट पॅकेजप्रमाणे आहे. या हंगामात विक्री वाढवून नुकसान काही अंशी कमी करण्याची त्यांना संधी आहे. त्यामुळे सध्या सर्व सामान्य लोकांसाठी दुचाकी-स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे.
 

सणात होते वर्षभरातील एक तृतीयांश विक्री
ऑटो उद्योगासाठी नवरात्रीपासून पुढील ४५ दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या कालावधीत वर्षभरात विकल्या जाणाऱ्या दुचाकी-स्कूटरच्या एक तृतीयांश होते. भारतीय यादरम्यान नवी आणि मौल्यवान सामग्री खरेदी करणे शुभ मानले जाते. यासोबत भारतीय वर्क फोर्सला यादरम्यान बोनसही मिळतो, ज्यांचा वापर ते डाऊन पेमेंटच्या रूपात करतात.
 

हीरो मोटोकॉर्प
> 5 हजार रु. च्या एक्स्चेंचचा लाभ {2 हजार रुपयांचा कॅश बेनिफिट
> 6.99%चा व्याजदर {3,999 डाऊन पेमेंट {10 हजाराचा पेटीएम लाभ
 

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर
> रिटेल फायनान्स स्कीमचा वापर करून 11 हजार रुपयांपर्यंतची सूट 
> पेटीएमद्वारे पैसे दिल्यास 7 हजार रुपयांपर्यंतची सूट
 

बजाज ऑटो
> 7200 रुपयापर्यंतचा फायदा, 5 फ्री सर्व्हिसिंग 
> 5 वर्षांची फ्री वॉरंटी. 3537 रुपयांचे कमी डाऊन पेमेंट