Home | International | Other Country | Officer goes above and beyond the badge by mowing elderly woman's lawn

ड्यूटीवर असलेल्या पोलिसाने वृद्ध महिलेच्या घरी जाऊन कापले तिच्या घरातील गवत

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 02:58 PM IST

वृद्ध महिलेने केला होता ओरोनो पोलिस स्टेशनमध्ये फोन, पण आवाज येत नव्हता स्पष्ट

 • Officer goes above and beyond the badge by mowing elderly woman's lawn

  मिनेसोटा (अमेरिका)- येथे एका पोलिस अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेच्या लॉनमधील गवत मशीनद्वारे कापले. या कृत्याची माहिती जेव्हा पोलिसाच्या सहकाऱ्यांना आणि इतर लोकांना कळाली तेव्हा त्यांनी पोलिसाची खिल्ली उडवली. पण जेव्हा बातमीची सत्यता सोशल मीडियावर आली तेव्हा सर्वत्र या पोलिस अधिकाऱ्याची प्रशंसा झाली.

  ओरोनोतील पोलिस स्टेशनमध्ये एका वृद्ध महिलेचा फोन आला होता. पण मॅट सिल्टला यांना महिलेचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत नव्हते. त्यामुळे मॅटला वाटले की, महिला अडचणीत आहे. त्यांनी तत्काळ महिलेच्या घरी धाव घेतली. पण ती वृद्ध महिला सुरक्षित असल्याची खात्री करून जेव्हा मॅट परतत असताना त्यांना लॉनमधील ऊंच वाढलेले गवत दिसले. यामुळे महिलेला जीवजंतूचा धोका होऊ शकतो, असा विचार करून पोलिसाने तिला याचे कारण विचारले. तर, महिलेने ती एकटीच राहत असल्यामुळे लॉन आणि तिची देखरेख करायला कोणीच नाही असे सांगितले. मॅट थोडा वेळ विचार केला आणि मशीन उचलून गवत कापायला सुरूवात केली.

  गर्वासारखी कामगिरी नाही
  मॅट यांनी सांगितले की, यात गर्व करण्याची कोणतीच गोष्ट नाही. ती वृद्ध महिला एकटीच राहत असल्यामुळे मी थोडी मदत केली. त्यानंतर पोलिस विभागाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या घटनेनंतर, अनेक लोकांनी महिलेला फोन केले आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

  लोकांकडून होत खूप प्रशंसा
  लोकांनी कमेंटमध्ये लिहिले की, सर्वांना लहानपणीच सर्वांवर दया, प्रेम, उपकार करणे शिकवणे गरजेचे आहे. आपणही एक दिवस वृद्ध होणार आहोत हे विसरूण चालणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणाची तरी मदतीची आवश्यकता असेल. म्हणून त्या पोलिस अधिकाऱ्याचे आभार, ज्याने आपला मौल्यवान वेळ काढून वृद्धेची मदत केली. या घटनेचा फोटो ओरोनो पोलिसांनी 6 जून रोजी आपल्या फेसबूकवर शेअर केला होता.

Trending