आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांनी खराब रस्त्यामुळे बस बंद केली, आ. सोळंकेंनी स्वत: बसून बस गावापर्यंत नेली

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माजलगाव - मागील तीन महिन्यांपासून मंजरथ गावाला बस जात नव्हती. एसटीच्या अधिकाऱ्यांकडूनही रस्त्याचे कारण सांगितले जाई. गावाला पुन्हा बस पूर्ववत सुरू व्हावी म्हणून ग्रामस्थांनी उपोषणाचाही इशारा दिला होता. याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांना मिळताच त्यांनी गुरुवारी थेट माजलगाव येथील एसटीच्या आगारात जाऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेत मंजरथ गावासाठी बस सोडण्याची मागणी केली. आगारातून बस बाहेर येताच त्याच बसमध्ये बसून आमदार सोळंके यांनी रस्त्याची पाहणी केली.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ हे गाव गोदावरी नदीकाठी असून हे गाव मराठवाड्यातील दक्षिणकाशी आहे. येथे  जिल्ह्यातून लोक दशक्रिया विधीसाठी येतात. या गावात  बसच्या दररोज  सात ते आठ फेऱ्या होतात.  रस्ता खराब असल्याच्या  कारणाने  मागील तीन महिन्यापासून बस बंद आहे. त्यामुळे या गावात  दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.  बस बंद असल्याने ग्रामस्थांनी  ४ डिसेंबर २०१९ रोजी थेट उपोषणाचा इशारा दिला होता. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना कळताच त्यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह थेट माजलगाव आगार गाठले. तेव्हा बस आगारात आगार प्रमुख डी. बी. काळम पाटील यांच्यासह विभागीय नियंत्रक जालिंदर शिरसाठ उपस्थित होते. आ. सोळंके यांनी एसटीच्या  अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मंजरथ बस ही रस्त्याच्या कारणावरून तुम्ही का बंद केली, ही सबब पटण्यासारखी नाही. जुन्या काळात पाणंद रस्त्याने बस चालत होत्या. मग आत्ताच काय झाले. अशी विचारणा केली. अशी कारणे सांगू नका आत्ताच बस सुरू करा, असे म्हणून कान उघाडणी  केल्यानंतर लगेचच मंजरथसाठी बस सोडण्यात आली. 

आयुष्यात पहिल्यांदा एसटीने प्रवास : 


बस सुरू करण्यासाठीची अडचण ऐकल्यानंतर आणि रस्ता केवळ दोन तीन जागीच खराब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी मी स्वतः गाडीत बसून प्रवास करणार असल्याचे सांगितले. मंजरथ बसने तब्बल सात किलोमीटर त्यांनी प्रवास केला. सोळंके यांच्या आयुष्यातील गुरुवारचा हा पहिलाच प्रवास होता.आमदार सोळंके यांच्यासह कार्यकर्ते बसमध्ये बसले 


कोणता रस्ता खराब झाला आहे याची पाहणी करण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके हे स्वत:  बसमध्ये बसले. माजलगावहून मंजरथ मार्गे बसचा प्रवास सुरू केला. सोबत सभापती अशोक डक, जिल्हा परिषद चंद्रकांत शेजूळ, जयदत्त नरवडे, कल्याण आबुज, खलील पटेल, नासेरखान पठाण, शेख मंजूर, दयानंद स्वामी, नगरसेवक भागवत भोसले, रोहन घाडगे आदींसह मंजरथ येथील प्रवासी देखील उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...