आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : 'नाळ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, नागराज मंजुळेंनी साकारली आहे ही भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच करण्यात आला. श्रीनिवास पोकळे या चिमुकल्याने साकारलेला ‘चैतन्य’ ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. ‘नाळ’ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील संवाद खुद्द नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत. 

 

‘नाळ’ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहेत. महाराष्ट्रातील दुर्गम भागात नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात चैतन्य राहतो. श्रीनिवास पोकळेने चैतन्यची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी साकारली आहे. तर चैतन्यचे भावनिक विश्व, त्याचा खोडकर स्वभाव आणि शेवटी अनपेक्षित वळण, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे ट्रेलरमधून दिसते.

 

चित्रपटाचा 2 मिनिटे 18 सेकंदाचा ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे  हा चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...