आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अा. गाेटेंनी गुंड म्हटलेल्या देवा साेनारसह भाजपमय राष्ट्रवादी नगरसेवकांची मुलाखत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पाेलिसाच्या डाेक्यात तलवारीचे वार करणाऱ्या अन् रावसाहेब दानवे यांनी पतीत करून घेतलेल्या तसेच अनिल गाेटे यांनी गुंड म्हणून संबाेधलेल्या देवा साेनारने अखेर प्रभाग क्रमांक १० साठी मुलाखत दिली. त्याचबराेबर भाजपत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या अाठ विद्यमान नगरसेवकांनीही भाजपकडे मुलाखत दिली. मंगळवारीही अामदार अनिल गाेटे समर्थकांनी मुलाखती दिल्या. भाजपकडून अंतिम उमेदवारांच्या यादीची घाेेषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनी दिली.


महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून १९५ जणांनी अर्ज घेतले हाेते. १८० जणांनी माहितीसह अर्ज पक्षांकडे भरून दिले. त्यानुसार पहिल्या दिवशी १ ते ९ प्रभागातील ७३ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मंगळवारी दुसऱ्या दिवशी १० ते १९ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यासाठी काेअर कमिटीच्या अामदार स्मिता वाघ, माजी जिल्हाप्रमुख विनाेद माेराणकर, चंद्रकांत गुजराथी, विजय पाच्छापूरकर, जयश्री अहिरराव, रत्ना बडगुजर, यशवंत येवलेकर, अाेम खंडेलवाल यांनी दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. निवडणुकीच्या घाेषणेपूर्वी व घाेषणेनंतरही काही राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला हाेता.त्यांच्यातर्फे शहरातील विविध प्रभागातून उमेदवारीसाठी भाजपकडे मुलाखतींना हजेरी लावण्यात अाली. या सर्वांच्या प्रवेशाला अामदार अनिल गाेटे यांचा विराेध असतानाही त्यांना प्रवेश दिला गेला हाेता. त्यामुळे पक्षांकडून त्यांना उमेदवारी दिली जाते की जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळते? याबाबत उत्सुकता असतांना दाेन दिवसात अाठ विद्यमान राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुलाखती दिल्यात.

 

त्यात प्रामुख्याने प्रभाग दाेनमध्ये नंदू साेनार, प्रभाग क्र. चारमध्ये नागसेन बाेरसे, राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे कांतीलाल दाळवाले, माजी शहर प्रमुख मनाेज माेरे यांच्या पत्नी भारती माेरे, महिला सभापती काशिश उदासी, राकेश कुलेवार यांच्या पत्नी िकरण कुलेवार, माजी नगरसेवक हर्ष रेलन,प्रभाग दहामधून माजी महापाैर जयश्री अहिरराव,प्रभाग चाैदामधून साेनल शिंदे, माजी स्थायी समिती सभापती दीपक खाेपडे, प्रभाग १७ साठी अमाेल मासुळे,चंद्रकांत साेनार, फिराेेज लाला यांचा समावेश अाहे. याशिवाय शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान गवळी, सुबाेध पाटील, डाॅ.सुनील चाैधरी, सुनील बैसाणे, मयूर कंड्रे, माजी नगरसेवक भिकन वराडे, माजी महापाैराचे चिरंजीव शीतल नवले, अभियंता चंद्रकांत उगले यांच्या पत्नी सुरेखा उगले, तसेच विद्यमान अपक्ष नगरसेविका जुलाल रेशमीबानाे अहमद यांनी मुलाखती दिल्या अाहेत. पक्षाच्या उमेदवारांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

प्रभाग १३ मध्ये केवळ एक इच्छुक…
तर शहरातील प्रभाक क्रमांक १३ मध्ये वडजाईराेड, अरिहंत मंगल कार्यालयाचा परिसराचा भाग येताे. या भागात बहुसंख्य अल्पसंख्याक मतदार अाहेत. त्यामुळे भाजपकडून या प्रभागासाठी केवळ एकच जण इच्छुक असल्याचे दिसून अाले. अाज झालेल्या मुलाखती मतीन खाटीक या एकमेव इच्छुकांने मुलाखत दिली असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात अाले.


यांनी दिल्या मुलाखती….
प्रभाग १० मधून सुनीता कर्पे, प्रभावती चाैधरी, देवेंद्र साेनार,संजय भील, हिरामण गवळी, प्रभाग ११ साठी दिनेश बागुल, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव,कमलाकर अहिरराव, वैशाली शिरसाठ, अमित पवार, प्रभाग १२ मधून भिकन वराडे, वैशाली वराडे, मनीषा वराडे, नूर माेहमंद पटवे, प्रभाग १४ मध्ये शंकुतला जाधव, साेनल शिंदे,युवराज पाटील, जीवन शेंडगे, कल्याणी अंपळकर, मेघना वाल्हे, दीपक खाेपडे, प्रभाग १५ मध्ये विमल वाळके, मीनल मुकुदे, याेगीता जगदेव, चित्रा शेलार, राजरत्न बैसाणे, बन्सीलाल जाधव, संजय जाधव, याेगेश मुकुंदे, प्रभाग १६ मध्ये याेगीता प्रशांत बागुल, सुमन पानपाटील, भारती अहिरराव, रेखा साेनवणे, चंद्रकांत उघडे, पिराजी गवळी, संताेष माेरे, विलास ढवले, नंदलाल अजळकर, प्रभाक-१७ मनाेेज पिसे, अमाेल मासुळे, वंदना मराठे (राजू महाराजची पत्नी), सुरेखा उगले, शीतल नवले, राजेंद्र चिताेडकर, प्रभाग -१८- पद्माकर साेनवणे, दगडू बागुल, सुभाष माेरे, सुरेखा देवरे, पुष्पा पवार, सुनीता वायसे, शिवाजी वायसे, प्रदीप जाधव, अमाेल शिंदे, राजेश पवार, अरविंद शिंदे, प्रभाग १९ मध्ये सुभान पिंजारी, जुला रेशमीबानाे अहमद, फिराेज बशीर शेख

बातम्या आणखी आहेत...